अंत्ययात्रा नेत असताना पुल कोसळून अनेक जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

गावाजवळील लोखंडी ब्रिजवरून अंत्ययात्रा नेण्यात येत असताना हा ब्रिज कोसळून अनेक लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 

महाबळेश्वर- गावाजवळील लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा नेण्यात येत असताना हा पुल कोसळून अनेक लोक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या खरोशी गावात ही दुर्घटना घडली. गंभीर दुखापत झालेल्या लोकांना उपचारासाठी महाबळेश्वर येथे हलविण्यात आले आहे. 

जखमी व्यक्तिंची नावे:-
1) भिमराव भागू कदम
2) रमेश भिमराव कदम
3) अशोक चांगु कदम
4) शंकर चांगु कदम
5) रामचंद्र सोनू कदम
6) विजय शंकर कदम
7) राजेश शंकर कदम
8) रमेश (मूल्या) धोंडू कदम अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे असून बाकी जखमींची नावे समजलेली नाहीत.

Web Title: Many people were injured when the bridge collapsed