मायणीत विकास कामांसह अनेकांची व्यक्तिगत कामेही खोळबंली

संजय जगताप
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मायणी - सुमारे सहा महिन्यांपासुन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंना मायणीत एंट्री मिळालेली नाही. त्यामुळे माय़णी गटात कुठेही गुदगेंच्या सभा-समारंभ, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका, कार्यक्रम होऊ शकले नाहीत. परिणामी विकास कामांसह अनेकांची व्यक्तिगत कामेही खोळबंली आहेत. पुरेशा संपर्काअभावी गावोगावच्या गुदगे समर्थकांत घट होऊन त्याचा लाभ आपणास मिळेल. असे विरोधकांना मनोमन वाटत असल्याने गुदगेंच्या नो एंट्रीने त्यांना गुदगुल्या होत आहेत.    

मायणी - सुमारे सहा महिन्यांपासुन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंना मायणीत एंट्री मिळालेली नाही. त्यामुळे माय़णी गटात कुठेही गुदगेंच्या सभा-समारंभ, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका, कार्यक्रम होऊ शकले नाहीत. परिणामी विकास कामांसह अनेकांची व्यक्तिगत कामेही खोळबंली आहेत. पुरेशा संपर्काअभावी गावोगावच्या गुदगे समर्थकांत घट होऊन त्याचा लाभ आपणास मिळेल. असे विरोधकांना मनोमन वाटत असल्याने गुदगेंच्या नो एंट्रीने त्यांना गुदगुल्या होत आहेत.    

त्याबाबतची माहिती अशी की, येथील केबलचालक आत्महत्या प्रकरणी सुरेंद्र गुदगेंना अंतरिम जामीन मिळाला. त्याचवेळी न्यायालयाने गुदगेंना मायणीत 'नो एंट्री'चे आदेश दिले. त्यामुळे सुमारे सहा महिन्यांपासुन गुदगेंची मायणी गटात एंट्री झालेली नाही. परिणामी गटात कुठेही गुदगेंच्या सभा-समारंभ, कार्यकर्त्यांसोबतच्या बैठका, विविध कार्यक्रम होऊ शकले नाहीत. विविध मंजुर विकासकामांची भुमिपुजने, उदघाटनेही रखडली आहेत. कार्यकर्त्यांची व्यक्तिगत कामेही थंडावली आहेत. 

गाव पातळीवरील राजकीय हालचाली, उलथापालथी, विरोधकांच्या भानगडी, खेळी, रखडलेली कामे यांकडे दूर्लक्ष होत आहे. राजकीय विचारांची देवाणघेवाण होत नाही. गुदगेंच्या नो एंट्रीचा फटका समर्थकांसह नागरिकांनाही बसत आहे. अनेक कामे खोळंबली आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी गटातील राजकीय वातावरणात निरुत्साह वाढु लागला आहे. गुदगेंच्या नो एंट्रीने स्थानिक कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. त्या अभुतपुर्व परिस्थितीने विरोधकांच्या गोटात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. संधी मिळताच गुदगें समर्थकांना टोचुन बोलत विरोधक तोडसुख घेत आहेत. खासगीमध्ये बोलताना आता कसं वाटतंय. कधी होणार नेत्यांची एंट्री, आता सुटी नाही. अशा जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त करुन गुदगेंच्या नो एंट्रीचा असुरी आनंद विरोधकांकडुन एंजॉय केला जात आहेत. राजकीय डावपेचात माहीर असलेल्या सुरेंद्र गुदगेंना आगामी विधानसभा निवडणुका होईपर्यंत एँट्री मिळु नये. असे त्यांना मनोमन वाटत आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या तारखेदिवशी काय निर्णय झाला. याबाबत माहिती घेण्यासाठी दिवसभर कार्यकर्ते सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह दिसतात. गुदगे समर्थकही न्यायालयाने दिलेल्या तारखेकडे व होणाऱ्या निर्णयाकडे डोळे लावुन बसत असतात. दरम्यान, मायणी गटातील विकास कामांचे भुमीपुजन व अन्य सार्वजनिक कार्यक्रम वगळता कोणतीही कामे अडलेली नाहीत. गुदगेंना भेटण्यासाठी कार्यकर्ते वडुज व सातारा येथे आवर्जुन जात आहेत. व्यक्तिगत कामेही करुन घेत आहेत. आवश्यक त्यावेळी वडुज येथील मायणी अर्बन बँकेच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्ते, मायणी अर्बन बॅंक व 'माय़णी भाग' शिक्षणसंस्थेच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बैठका, मीटींग आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या असुरी आनंदावर पाणी फिरत असल्याचे गुदगे समर्थकांकडुन प्रत्युत्तर दिले जात आहे. लवकरच गुदगेंची मायणीत दमदार एंट्री होवुन सर्वकाही पुर्ववत सुरळित होईल. असा विश्वास मायणी अर्बन बँकेचे माजी संचालक सुभाषराव बागडे यांनी सकाळजवळ व्यक्त केला.     

Web Title: Many personal activities including many developmental projects have been identified