कृष्णाकाठच्या गावांना महापुराचा तडाखा (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

सागंली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ताकारी, तुपारी, दुधारी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, मसुची वाडी, आणि बोरगांव या गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे.

वाळवा : सागंली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ताकारी, तुपारी, दुधारी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, मसुची वाडी, आणि बोरगांव या गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे.

व्हिडिओत गावातील शेतीचे पूर्ण नुकसान झालेले दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

सध्या पाण्याची जोर कमी होत असून घाणीचे साम्राज्य गावांमध्ये मोठ्या प्रमावर पसरले असून त्याठिकाणी उग्र वास येत आहे. गावकरी मात्र अजूनही गावात गेलेले नसून पाणी ओसरण्याची व परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट पाहत आहेत. कृष्णानदीवरील पूल अजून पाण्याखाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many villages in valva taluka hit by floods