कऱ्हाडच्या मराठा महिलांचे आझाद मैदानावर लवकरच बेमुदत धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

केंद्र व राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात अनेकदा आश्वासने दिली गेली. मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे दहा लाख रुपयांचे कर्ज मराठा समाजाला दिले जाईल असे जाहीर करण्यात आले. मात्र त्या कर्जाची योजना सर्व समाजासाठी लागू आहे.

कऱ्हाड : मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी कऱ्हाडच्या मराठा महिला मुंबईच्या आझाद मैदानावर 23 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. मराठा समाजाच्या महिलांच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.              

केंद्र व राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात अनेकदा आश्वासने दिली गेली. मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे दहा लाख रुपयांचे कर्ज मराठा समाजाला दिले जाईल असे जाहीर करण्यात आले. मात्र त्या कर्जाची योजना सर्व समाजासाठी लागू आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारने 15 नोव्हेंबरची मुदत दिली आहे. मात्र त्या मुदतीत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण होईल असे आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत कराडच्या रणरागिणी बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवतील असाही निर्धार महिलांनी केला.

 

Web Title: Maratha Agitation of the Maratha women of Karhad soon at Azad Maidan