#MarathaKrantiMorcha सातारा जिल्ह्यात धग कायम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जुलै 2018

सातारा - मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आजही सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कायम होती. सुरू असलेल्या आंदोलनामुळे विविध गावांत जाणाऱ्या एसटीच्या 49 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, पुणे जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या बस दुपारी चारनंतर थांबविण्यात आल्या. सांगली आणि कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या बस साताऱ्यातच थांबविण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

सातारा - मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची धग आजही सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कायम होती. सुरू असलेल्या आंदोलनामुळे विविध गावांत जाणाऱ्या एसटीच्या 49 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. दरम्यान, पुणे जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या बस दुपारी चारनंतर थांबविण्यात आल्या. सांगली आणि कोल्हापूरहून पुण्याला जाणाऱ्या बस साताऱ्यातच थांबविण्यात येत होत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. जिल्ह्यात तसेच पुण्यातील आंदोलनाची तीव्रता कमी झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनंतर बसच्या फेऱ्या पूर्ववत होतील, असे स्पष्ट करण्यात आले. 

जिल्ह्यात धग कायम 
- दहिवडीत हजारोंच्या संख्येने मोर्चा 
- फलटणमध्ये धोंडापूजन; धनगर समाजाचा ठिय्या 
- वडूजमध्ये महिलांचे "जेल भरो' 
- वाई पालिकेची सभा तहकूब 
- कऱ्हाडमध्ये महिला उतरणार रस्त्यावर 

Web Title: Maratha agitation was still in the Satara district