मुख्यमंत्र्यांना आषाढीला रोखणारा मराठा समाज आता करणार सत्कार

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

पंढरपूर : आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक झालेला मराठा समाज आता आरक्षण मिळाल्यानंतर शांत झाला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना याच प्रश्नावरून विठ्ठलाच्या शासकीय महापूजे पासून रोखणाऱ्या याच सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीवारीत त्यांचा जंगी सत्कार करणार आहे.

या संबंधी आज येथील सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने अनेक आंदोलने मोर्चे काढले. दोन वर्षांपूर्वी समाजाच्या वतीने राज्यभरात शांततेच्या मार्गाने  56 मोर्चे काढले. त्यानंतर ही शासन पातळीवर कोणतीही दखल घेतली जात नसल्याची सल समाज बांधवांमध्ये होती.

यातूनच मागील वर्षी येथील सकल मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या महापूजेला विरोध केला होता..त्यानंतर राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत आणि भाविकांच्या सुरक्षेला अधिक महत्व देत आषाढीची पूजा न करण्याचा निर्णय घेतला होता. मनात विठ्ठलाचे प्रेम असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या मुंबई येथील वर्षा निवस्थानी विठ्ठलाची पूजा करून आषाढी सोहळा साजरा केला होता.

दरम्यानच्या काळात भाजप सेना युती सरकारने 16 टक्के आरक्षण देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 27 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली यामध्ये न्यायालयाने नोकरीमध्ये 13 तर शिक्षणासाठी 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे व सरकारच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यसाठी मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांनी वेळोवेळी मदत केली म्हणून पंढरपुरात आषाढी वारीत फडणवीस यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यापासून रोखणारे समाज बांधव आता त्याचाच जंगी सत्कार करणार आहेत. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, जयवंत माने, किरण घाडगे, शेखर भोसले, दत्ता पाटील, मोहन अनपट आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com