मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण द्यावे : उदयनराजे

मराठ्यांना ओबीसीतच आरक्षण द्यावे : उदयनराजे

कऱ्हाड : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल नुकताच आला आहे. एससीबीसी आरक्षणातून फक्त सवलती मिळणार आहेत. त्या सवलती देऊन उपयोग नाही. आरक्षणाला ओबीसीचा दर्जा दिल तरच त्याचा फायदा होईल. तसेच सध्या आहे तोच दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.  

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार भोसले आज (रविवार) आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मात्र, ते एससीबीसी देऊ नये. त्यातून फक्त सवलती मिळणार आहेत. सवलती देऊन उपयोग नाही. ज्या हेतूसाठी लोकं भांडताहेत तो हेतू त्यातून साध्य होणार नाही. इतर समाजाची मला तुलना करायची नाही. मात्र, इतर समाजांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आरक्षण दिले गेले. त्यावेळी कोणत्या आयोगाकडे पत्र पाठवले नव्हते. त्यामुळे संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे आणि तेही ओबीसीचे आरक्षण दिल गेले पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com