करमाळ्यात मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

अण्णा काळे
शनिवार, 21 जुलै 2018

करमाळा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वातीने आज शनिवारी (ता. 21) करमाळा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आंदोलनात तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले.

मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रात एकूण 58 मोर्चे काढण्यात आले तरीही शासनाच्या वतीने यावर ठोस निर्णय घेतला नाही. जिल्ह्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी मराठा संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने करण्यात येत आहेत. करमाळा तालुक्यातही शुक्रवारी (ता. 20 रोजी) रात्री नऊच्या सुमारास करमाळा तहसीलदार संजय पवार व पोलीस निरीक्षक राजेश देवरे यांना ठिय्या आंदोलनचे निवेदन देण्यात आले. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून मराठा समाजातील विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, वकील व समाज बांधाव ठिय्या मांडून तहसील कार्यालय समोर बसले आहेत.

दुपारी एकच्या सुमारास तहसीलदार संजय पवार हे कार्यालयात जात असताना सर्व आंदोलकांनी त्यांना घेराव घातला व आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. यावेळी जोरजोरात आरक्षणाच्या बाबतीत घोषणा देण्यात आल्या. यावेळी शांततेचे आवाहन करत आपला आवाज शासनाच्या पर्यंत पोहोचत करू असं आश्वासन तहसीलदार संजय पवार यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला.

Web Title: Maratha community stance agitation