‘मराठा’ प्रश्‍नावर १ जुलैपासून आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासह अन्य प्रश्‍नांच्या पूर्ततेसाठी १ जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा, आज नव्याने स्थापन झालेल्या मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली. शिक्षण, आरक्षण व संरक्षण या त्रिसूत्रीवर संघटना काम करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण देण्यासह अन्य प्रश्‍नांच्या पूर्ततेसाठी १ जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा, आज नव्याने स्थापन झालेल्या मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली. शिक्षण, आरक्षण व संरक्षण या त्रिसूत्रीवर संघटना काम करणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

शाहू स्मारक भवनात नव्याने स्थापन झालेल्या मराठा क्रांती संघटनेची घोषणा करण्यात आली. या वेळी कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, उपाध्यक्ष माजी पोलिस महासंचालक अजित पाटील, सचिव भरत पाटील, खजिनदार गोपाळ दळवी, कार्यकारिणी सदस्य किशोर देसाई, विजय पाटील, चंद्रकांत सावंत, सुनीता पाटील, राणी पाटील व कार्यकारिणी उपाध्यक्ष महादेव साळुंखे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील २३ जिल्हे व छोट्या-मोठ्या १७ संघटना एकत्र करून नव्याने मराठा क्रांती संघटनेची स्थापना केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासह अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. म्हणूनच ९ जुलैला मागासवर्गीय आयोगाच्या पुणे येथील कार्यालयावर रोखठोक आंदोलन केले जाणार आहे. या आयोगाकडून शिफारशी लागू करून त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणला जाणार आहे. तसेच ९ ऑगस्टला राज्यात याच मागण्यांसाठी चक्‍का जाम आंदोलन करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

मराठा समाजाचे प्रश्‍न सोडवण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ही संघटना काम करणार आहे. या संघटनेत अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा सेवा संघ सहभागी झालेले नाहीत. ते स्वतंत्र अस्तित्व ठेवणार असतील तर काही हरकत नाही. त्यांना पाठिंबा आहे. मात्र, मराठा समाजासाठी जे बरोबर येतील त्यांना घेऊन जाण्याची तयारी असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत 
यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत होतो. दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्‍नांवर एक गोलमेज परिषद घेतली. त्या वेळी सदाभाऊंना असे वाटले, की संघटनेकडून सरकारवर नाहक आरोप होतील व त्याचा त्रास होईल. यामुळे त्यांनी मला रयत संघटनेचे काम करणे अडचणीचे होईल, असे सांगितले. त्यामुळे बाजूला झालो
- सुरेश पाटील

Web Title: maratha issue agitation maratha kranti morcha