मराठा आंदोलकांचा करमाळ्यात तिरडी मोर्चा

अण्णा काळे 
सोमवार, 30 जुलै 2018

करमाळा (सोलापूर) : मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साधारणपणे दहा हजार लोक सहभागी झाले होते.

करमाळा (सोलापूर) : मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचा निषेध म्हणून तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात साधारणपणे दहा हजार लोक सहभागी झाले होते.

हा मोर्चा करमाळा येथील पोथर नाका-जय महाराष्ट्र चौक -छत्रपती चौक -सुभाष चौक ते तहसील कार्यालय असा काढण्यात आला. या मोर्चात सर्व पक्षाचे, विविध संघटनेचे लोक सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांची तिरडी बांधून चौघांनी ही तिरडी घेतली, तर त्यापुढे एक जण मडके घेऊन चालत होता. याच्या मागे संपुर्ण मोर्चा चालत होतो. यावेळी शासनाच्या निषेधार्थ जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. या वेळी शाळकरी विद्यार्थीही यात सहभागी झाले होती.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.तहसील कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप झाला.यावेळी पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

यावेळी मुलीच्या हस्ते तहसीलदार संजय पवार, पोलिस निरीक्षक राजेश देवरे यांना मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान करमाळा तहसील कार्यालयासमोर गेली दहा दिवसापासुन सुरू असलेले ठिय्या आंदोलन थांबवण्यात आले आहे. आज संपूर्ण जिल्हा बंद असतानाही करमाळा येथे सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.माञ एकही एस.टीची फेरी झाली 

Web Title: maratha kranti morcha at karmala tirdi rally