७० रुग्णवाहिका, ७०० डॉक्‍टरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - सकल मराठा समाजातर्फे १५ ऑक्‍टोबरला कोल्हापुरातून निघणाऱ्या मूक मोर्चामध्ये ७० रुग्णवाहिकांसह ७०० मराठा डॉक्‍टरांचा सहभाग असणार आहे. शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर डॉक्‍टरांचे एक पथक तैनात केले जाणार आहे. लाखोंची गर्दी होणार असल्याने औषधोपचार करण्यासाठी थेट गर्दीतच डॉक्‍टरांनी व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पाठीवर बॅग घेऊन औषध घेऊन जाण्याचा निर्णयही घेतला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, कोपर्डीतील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी यांसह इतर मागण्यांसाठी निघणाऱ्या मोर्चात मराठा डॉक्‍टर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या एखाद्या व्यक्तीला चक्कर किंवा फिट आली तर त्याच्यावर कसे उपचार करावेत, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यासाठी सर्वच डॉक्‍टरांचे एकमत झाले आहे. 

या वेळी डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. मानसिंग मोहिते, डॉ. हरिश पाटील, डॉ. दीपक पाटील, डॉ. राजेश पाटील, डॉ. शिवराज देसाई, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शैलेंद्र सावंत, डॉ. सुनील सावंत, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. उमेश कदम, डॉ. दत्ता पावले, डॉ. दिलीप देसाई, डॉ. संदीप कदम, डॉ. शीतल देसाई, डॉ. प्रद्युम्न वैराट, डॉ. बाजीराव पाटील, डॉ. विजय चव्हाण, डॉ. भरत कोटकर, डॉ. कविता भांडुर्गे, डॉ. मीनाक्षी काणे, डॉ. सुजाता पाटील, डॉ. नीलिमा पाटील, डॉ. ममता पाटील, डॉ. रश्‍मी चव्हाण, डॉ. रूपाली सोमण, डॉ. मंजूषा पोटे व डॉ. उषा पाटील उपस्थित होते.

Web Title: maratha kranti morcha in kolhapur