Maratha Kranti Morcha आरक्षणासाठी काय पण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - समाजाने सांगितले, तुम्ही मागे उभे राहा, आम्ही मागे थांबलो. आता म्हणता नेतृत्व करा, तेही करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे, असा वज्रनिर्धार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली. 

कोल्हापूर - समाजाने सांगितले, तुम्ही मागे उभे राहा, आम्ही मागे थांबलो. आता म्हणता नेतृत्व करा, तेही करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे, असा वज्रनिर्धार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विशेष अधिवेशन घ्यावे, ही मागणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. यासाठी आमदार आणि खासदारांनी सरकारवर दबाव आणावा, ही मागणी करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत दिलीप देसाई यांनी प्रास्ताविक केले. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले आहे. पण, आमचा त्यावर विश्‍वास नाही. त्यांनी विशेष अधिवेशन घेऊन त्यात आरक्षण कसे देणार ते सांगावे. पत्रकार चंद्रकांत पाटील म्हणाले, की ‘ओबीसी’त मराठा समाजाचा समावेश कसा करणार, ते सांगावे. यानंतर वसंत मुळीक, हर्षल सुुर्वे, स्वप्नील पार्टे यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन तोडकर, शंकरराव शेळके, चंद्रकांत बराले, फत्तेसिंह सावंत, दिलीप सावंत, किशोर घाटगे उपस्थित होते.

आरक्षणप्रश्‍नी सरकार चालढकल करते. त्यामुळे आता विशेष अधिवेशन घेऊन त्यात आरक्षणाची घोषणा करणे गरजेचे आहे. यासाठी विशेष अधिवेशनाच्या मागणीलाच प्राधान्य दिले पाहिजे. 
- आमदार संध्यादेवी कुपेकर

मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी करणे आवश्‍यक आहे. आमदारांचा दबावगट विधानसभा सभागृहात असायला हवा. 
- आमदार सत्यजित पाटील

मागासवर्गीय आयोगासमोर मी मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. मूक मोर्चा असो की ठिय्या आंदोलन, मी नेहमीच मराठा समाजाबरोबर आहे. सर्वजण जो निर्णय घेतील, ते मला मान्य आहे. 
- आमदार डॉ. सुजित मिणचेकर

उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांना विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. आम्ही नेहमीच मराठा समाजाच्या बाजूने उभे आहोत. जसे समाज सांगेल तसे करू. 
- आमदार राजेश क्षीरसागर

सकल मराठा समाजाचा लोकप्रतिनिधींबरोबर चांगला समन्वय आहे. असाच समन्वय सर्व राज्यांत ठेवून सर्व आमदार आणि खासदारांना मराठा आंदोलनात सक्रिय केले पाहिजे. 
- आमदार चंद्रदीप नरके

ज्यावेळी आंदोलन तीव्र होते, त्यावेळी सरकार काही तरी हालचाल करते. नोव्हेंबरअखेरपर्यंत आरक्षण मिळायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे. 
- आमदार प्रकाश आबिटकर 

लेटरपॅडवर मुख्यमंत्र्यांना देण्याचा मजकूर आंदोलकांनी लिहावा, आम्ही सर्वजण त्यावर सह्या करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहोत.
- आमदार हसन मुश्रीफ

विशेष अधिवेशन जाहीर करण्यासाठी आंदोलकांनी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत सरकारला दिली आहे. पण, अधिवेशन जाहीर करण्याची संविधानिक प्रक्रिया पाहता ही मुदत वाढविणे गरजेचे आहे.  
- आमदार अमल महाडिक

Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation