Maratha Kranti Morcha : आरक्षणासाठी बुधवारी खुली बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठीच्या अंतिम लढाईची पुढील दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. २२) खुली बैठक होत आहे. बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील बारा तालुके व शहर समन्वयकांसह पश्‍चिम महाराष्ट्रातील समन्वयक सहभागी होत आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजाचे संयोजक दिलीप देसाई यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

बाजार समिती येथील मुस्कान लॉन येथे सकाळी साडेदहा ते दुपारी एक कार्यकर्त्यांची, तर एक ते सायंकाळी पाच या वेळेत समन्वयकांची बैठक होणार आहे. श्री. देसाई म्हणाले, ‘‘जिल्ह्यात तालुकास्तरीय आंदोलन सुरू आहे. एकत्रित आंदोलन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत तालुका व शहर समन्वयक मते मांडतील. त्यांच्या अडचणी, पुढील धोरणे यावर ऊहापोह होईल. याच ठिकाणी दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत कोल्हापूरसह सोलापूर, पंढरपूर, मिरज, सांगली, शिरोळ, इचलकरंजी, हातकणंगले, कऱ्हाड, सातारा, पुणे, मुंबईतील समन्वयकांची बैठक होईल. त्यात आरक्षणाव्यतिरिक्त अन्य शैक्षणिक मागण्यांच्या चर्चेसह अंतिम लढाईची पुढील दिशा व आचारसंहिता ठरविण्यात येणार आहे.’’ 

हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘शिवाजी पेठेच्या मोर्चास आमचा पाठिंबा आहे. सर्व तालीम, मंडळे यांनी आंदोलन करावे. हा आमच्या गनिमी काव्याचा एक भाग आहे. त्यातून आमची ताकद वाढेल.’’  वसंतराव मुळीक यांनी मराठा समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पत्रकार परिषदेस इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, किशोर घाटगे, गणी आजरेकर उपस्थित होते.

भूलथापांना बळी नका पडू 
आजचे सरकार चाणक्‍यनीतीचे आहे. ज्या आमदाराने राजीनामा दिला, तो अजून मंजूर झालेला नाही. तो भाजपच्या नेत्याचा जावई आहे. 
मराठा समाजाने भूलथापांना बळी पडू नये. मराठा समाजात फूट पाडण्याचे पद्धतशीर षड्‌यंत्र आखले जात आहे, असा आरोप श्री. देसाई यांनी केला.

Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation Meeting