मराठा आंदोलनाची धग मोहोळमध्येही

राजकुमार शहा 
सोमवार, 30 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) : मराठा आरक्षणाच्या मागणीची धग ग्रामिण भागात मोठया प्रमाणात दिसत असुन आज तालुक्यातील अनेक गावात बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी टायर पेटवुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी ठिय्या अंदोलने करण्यात आली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठी समाजा तर्फे जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते, त्याला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसुन आला. तालुक्यातील आष्टी, बेगमपूर, शेटफळ, देवडी, अनगर आदींसह अन्य गावात मोठ्या प्रमाणात बंद पाळण्यात आला. मोहोळ. आष्टी येथे रास्ता रोको करण्यात आला. तर वाफळे शेटफळ आदी ठिकाणी रस्त्यावर टायर टाकुन जाळण्यात आले. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

राज्य परिवहन महामंडळाच्या बसची तोडफोड होऊ नये म्हणुन महामंडळाने बस वाहतुक बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आज तुरळक वगळता एकही बस रस्तावर धावली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. एरवी प्रवाशाने गजबजलेले मोहोळ बसस्थानकात शुकशुकाट दिसत होता अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन पोलीसानी फिरती गस्त सुरू ठेवली होती.

Web Title: maratha kranti morcha at mohol