मराठा समाजाचा सोलापूरमध्ये चक्काजाम, मुंडण आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

सोलापूर : राज्य सरकारने काढलेली मेगा नोकरभरती मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय करु नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्यासाठी आज सोलापूर शहर सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले. जुना पुना नाका येथे मुंडण आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. बसस्टँड जवळ असलेल्या शिवाजी चौकात तब्बल दिडतास आंदोलन झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन समाप्त झाले.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्काजाम तर छत्रपती संभाजी महाराज चौकात मुंडन आणि बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 50 टक्के शुल्काची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी, राज्य सरकारच्या नोकरभरतीत 16 टक्के आरक्षणाचा अध्यादेश काढून त्याचे कायद्यात रूपांतर करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अंतर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावे अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. सरकारला हा शेवटचा इशारा दिला असल्याच समाजाचे म्हणणे असून यापुढे आक्रमकपणे लढा उभाण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने केलाय.

Web Title: Maratha Kranti morcha protest in solapur