एक मराठा, लाख मराठा... गीताचा झंझावात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

आशीष मिठारी यांचे प्रेरणादायी गीत - दोन हजार सीडींचे होणार मोफत वितरण

कोल्हापूर - 
   जात वाघाची आहे मराठा, 
हिंदू मनाचा आहे मराठा.
   जिजाऊंचा बाळ मराठा, 
भगवा झेंडा आहे मराठा.
एक मराठा, लाख मराठा.....

आशीष मिठारी यांचे प्रेरणादायी गीत - दोन हजार सीडींचे होणार मोफत वितरण

कोल्हापूर - 
   जात वाघाची आहे मराठा, 
हिंदू मनाचा आहे मराठा.
   जिजाऊंचा बाळ मराठा, 
भगवा झेंडा आहे मराठा.
एक मराठा, लाख मराठा.....

मराठा क्रांती मोर्चानिमित्त कोल्हापुरातील आशीष मिठारी या मावळ्याने तयार केलेले हे प्रेरणागीत महाराष्ट्राच्या तळागाळातील मराठ्यांच्या नसानसात्‌ भिनणार आहे. मिठारी यांनी या गीताच्या दोन हजार सीडी स्वखर्चाने काढल्या असून त्या मोफत वितरित केल्या जाणार आहेत. ‘एक मराठा, लाख मराठा’ हे गीत ऐकताना अंगावर काटा उभारल्याशिवाय राहत नाही. सळसळते संगीत, अर्थपूर्ण शब्द आणि पहाडी आवाजाने या गीताला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ऐतिहासिक किंवा देशप्रेमावर आधारित गीत, संगीत आणि गायनाची आवड असलेल्या मिठारी यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या दूरचित्रवाणीवरील मालिकेत शिवाजी महाराज अफझलखानाचा वध करताना पार्श्‍व गायन आणि संगीत दिले असल्याचे सांगितले.

श्री मिठारी म्हणाले, ‘‘लहानपणापासून मी अनुभवलेल्या मराठ्यांचं प्रतिबिंब या गीताच्या माध्यमातून मराठा मूक मोर्चाच्या औचित्य साधून हे गीत मराठा हृदयांना समर्पित केले आहे.’’ 

यापूर्वी ‘शिवबांचे मावळे आम्ही आमच्याशी वैर कोणी कराया बघू नका, आमच्या नादाला लागू नका. खानाचा कोथळा एकट्या वाघाने काढला, ढाण्या वाघाला विसरू नका, आमच्या नादाला लागू नका’ हे खास शिवजयंतीसाठी निर्मित केलेल्या गीतानेही संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आहे. आता ‘एक मराठा, लाख मराठा’ हे गीतही लोकांच्या मनाला स्पर्श करणार आहे. दरम्यान, या गीताच्या दोन हजार सीडी शाहूपुरी येथील पाच बंगल्यासमोर घर क्रमांक १११७ येथे मोफत वितरित केल्या जाणार आहेत.

Web Title: maratha kranti morcha song