#MarathaKrantiMorcha वडगावपान टोल नाक्‍यावर पेटवली एसटी बस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

तालुक्‍यातील वडगावपान जवळील टोल नाक्‍यावर रात्री पावणेबारा वाजता नाशिक-पंढरपूर एसटी बसला सहा ते सात युवकांनी अडवून पेटविले. चालक-वाहक व बसमधील प्रवाशांना उतरविल्यानंतर ही बस पेटविण्यात आली.

संगमनेर : तालुक्‍यातील वडगावपान जवळील टोल नाक्‍यावर रात्री पावणेबारा वाजता नाशिक-पंढरपूर एसटी बसला सहा ते सात युवकांनी अडवून पेटविले. चालक-वाहक व बसमधील प्रवाशांना उतरविल्यानंतर ही बस पेटविण्यात आली. यावेळी दगडफेक करुन एसटी बसच्या काचा फोडल्या. याप्रकरणी बस चालकाने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

रात्री पावणेबाराच्या सुमारास वडगावपान जवळील टोल नाक्‍याजवळ नाशिक-पंढरपूर बस आली. त्यावेळी तोंडाला फडके बांधून आलेल्या सहा ते सात युवकांनी बस अडविली. प्रवाशांसह सर्वांना उतरुन बसच्या मागील बाजूला ज्वलनशील पदार्थ टाकून बसला आग लावली. तसेच गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या आणि घोषणाबाजी केली, असे चालक कमलाकर पंडीत कोळी (रा. नाशिक) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरुन तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Maratha Kranti Morcha ST bus Fire at Vadgaan toll plaza