#MarathaKrantiMorcha मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाची धग कायम 

दावल इनामदार
मंगळवार, 24 जुलै 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा मराठा मोर्चा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्युनंतर मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बंदचे आवाहन करुन आज पूर्ण बाजारपेठेतील दुकाने बंद ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करुन व्यापार पेठ उस्फूर्तपणे बंद करण्यात  आली.

आज सकाळ पासून बाजारपेठेत शुकशुुकाट असून प्रमुख विविध मार्गावरील प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली होती. मराठा आरक्षणाची धग कायम असून प्राथमिक  व माध्यमिक शाळा सुट्टी देण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांकडून मोटर सायकल रॅली काढून शहरामधील सर्व व्यापारपेठ बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे या बंदचा वारंवार फटका व्यापारी वर्गास बसला असून सरकारने मराठा आरक्षणचा निर्णय लवकर घ्यावा असे व्यापारी वर्गातून बोलले जात होते. 

Web Title: maratha kranti morcha still on agitation