उलाढाल कोटीच्या घरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. टी शर्ट, झेंडे, टोप्या, डिजिटल प्रिंटिंग, वाहनांवरील स्टीकर्स, भगव्या साड्या, भगवे फेटे आदी वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी गावागावांतील दुकाने सजली आहेत. मोठ्या जाहिरातींद्वारे या साहित्यांची विक्री सुरू आहे. 

कोल्हापूर - मराठा समाजाच्या वतीने कोल्हापुरात १५ ऑक्‍टोबरला निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने होणारी उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. टी शर्ट, झेंडे, टोप्या, डिजिटल प्रिंटिंग, वाहनांवरील स्टीकर्स, भगव्या साड्या, भगवे फेटे आदी वस्तूंची मागणी प्रचंड वाढली आहे. या वस्तूंच्या विक्रीसाठी गावागावांतील दुकाने सजली आहेत. मोठ्या जाहिरातींद्वारे या साहित्यांची विक्री सुरू आहे. 

‘ना नेता, ना घोषणा’ असे राज्यभर या मोर्चाचे स्वरूप आहे; पण मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत त्या टी शर्ट, बॅनरवरील मजकुराने लोकापर्यंत, शासनदरबारी पोचवाव्यात, मोर्चाचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे, यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. त्यात मराठा समाजातील तरुण आघाडीवर आहेत. राज्यभर काळे टी शर्ट, त्यावर मराठा क्रांतीचे चिन्ह, डोक्‍यावर ‘मी मराठा’ लिहिलेली टोपी किंवा भगवा फेटा, भगव्या साडीतील महिला, गळ्यात भगवा स्कार्प, हातात झेंडा आणि मराठा समाजाच्या मागण्यांचे फलक असे चित्र राज्यभर पाहायला मिळाले. 
कोल्हापुरातही १५ ऑक्‍टोबरला यापेक्षा वेगळे चित्र दिसणार नाही. राज्याचे लक्ष कोल्हापूरच्या मोर्चावर आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक मोर्चात सहभागी व्हावेत यासाठी गावागावांत जनजागृती बैठका सुरू आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्यांकडून टी शर्ट, टोप्या, स्कार्प, झेंडे आदी साहित्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या शिवाय दुचाकीपासून ते मोठ्या वाहनांवर लावण्यात येणाऱ्या स्टीकर्सचीही विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही चारचाकी वाहनांवर गेल्या पंधरा दिवसांपासूनच मोर्चाचे स्टीकर्स व भगवे ध्वज डौलाने फडकू लागले आहेत. या साहित्यांची मोठी उलाढाला बाजारात होत आहे. 

शहर व जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मोठमोठे डिजिटल फलक, स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापेक्षा जास्त प्रमाणात या फलकांसह कमानीवर डिजिटल प्रिंटिंगसाठी मागणी वाढली आहे. या क्षेत्रातील व्यावसायिकांनाही या निमित्ताने एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला आहे. याशिवाय काही नेत्यांनी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पॅकेट्‌स, मोर्चाच्या मार्गावर सरबत, तसेच पाण्याचे स्टॉल्स उभे करण्याची घोषणा केली आहे. या निमित्ताने होणारी उलाढालाही मोठी असणार आहे. गेल्या महिन्यापासून ते १५ ऑक्‍टोबरपर्यंत या मोर्चाच्या निमित्ताने जिल्ह्यात किमान १०० कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

संयोजनासाठीच ३५ लाखांचा खर्च
मोर्चाच्या संयोजनासाठीच किमान ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नियोजन समितीकडून उघडण्यात आलेली कार्यालये, वॉर रूम, ठिकठिकाणी उभे केलेले डिजिटल फलक, गावागावांत जाऊन घेण्यात येणाऱ्या बैठका यांवरील खर्चाचाही यात समावेश असेल. मोर्चाच्या दिवशी ज्या ठिकाणी सांगता असेल त्या ठिकाणी उभारण्यात येणारे व्यासपीठ, स्पिकर्स, जनरेटरची सोय यांवरील खर्चही मोठा असणार आहे.  

गाणी, व्हिडिओ यांवरही खर्च
या मोर्चासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी स्वतःहूनच तरुणांकडून होत आहे. समाजातील काही होतकरू तरुणांनी या मोर्चाशी संबंधित गाणी तयार करून त्याचा व्हिडिओही तयार केला आहे. यावर होणारा खर्चही वेगळाच आहे. व्हाट्‌स ॲपवर ही गाणी फिरत आहेत, तरी काहींच्या मोबाइलच्या रिंगटोनवरही हीच गाणी झाली आहेत.

Web Title: maratha kranti morcha transaction

टॅग्स