#MarathaKrantiMorcha हम फिर आयेंगे लाखोंमे... 

भूषण पाटील
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने गुरुवारी (ता. ९) राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी कंबर कसली आहे. तरुणाईने यात पुढाकार घेतला आहे. बंदमध्ये जास्तीतजास्त जणांनी सहभागी व्हावे, यासाठी सोशल मीडियातून आवाहन केले जात आहे. ‘देख लेना आखोंसे, हमी फिर आयेंगे लाखोंमे’ असा विश्वास व्यक्त करत कारण सांगायचं नाही, यायलाच लागतंय’ अशी आपुलकीची कोल्हापुरी हाक समाज बांधवांना दिली आहे. 

काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. जिल्ह्यात हे आंदोलन ताकदीने सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी याला हिंसक वळण लागले. मात्र, या परिस्थितीत कोल्हापूरने आपले पुरोगामित्व जपत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे. समाजातर्फे उद्या राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

जिल्ह्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तरुणाईने यात पुढाकार घेतला आहे. बंद आवाहनासाठी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. आज दिवसभर व्हॉट्‌सअप, फेसबुकच्या माध्यमातून भावनिक आवाहनाबरोबरच इशारा देणारे मेसेज फिरत होते. ‘इतर समाजावर अन्याय झाल्यास मराठा समाज गप्प बसत नाही, मग मराठा समाजावर अन्याय झाला तर समाज गप्प कसा बसेल’ अशी विचारणा करत ‘आपण एक होतो, आहोत, आणि राहणार’ अशा आशयाचे मेसेज तरुणाईकडून फॉरवर्ड केले गेले.

भावनिक कविताही
कारणे सांगायची नाहीत. गुरुवारी यायलाच लागतंय’ अशी कोल्हापूरची आपुलकीची हाक होती तर ‘बंद म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र बंद’अशा आशयाच्या मेसेजद्वारे बंद यशस्वी करण्याचा निर्धार तरुणाई करत होती. ‘जो नाही येणार मोर्चाला, तो कलंकच ठरेल मराठ्याला,’ अशा भावनिक कवितासुद्धा दिवसभर शेअर होत होत्या. ‘देख लेना आखोंमे, हम फिर आयेंगे लाखोंमे’सारख्या मेसेजमधून तरुणाईचा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. वातावरणनिर्मितीसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर तरुणाईने केला.

Web Title: Maratha Kranti Morcha We will come again