'दुष्काळग्रस्त भागातील तरुणांना नोकऱ्या द्याव्यात'

employment
employment

नगर : दुष्काळाची आपत्ती सातत्याने येत आहे. अशी आपत्ती आली की मदतीची मागणी केली जाते. मुळात ती मदत तात्पुरती असते. दुष्काळासह शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी दुष्काळग्रस्त, तसेच  आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुणांना सरकारने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यानी पत्रकार परिषदेत केली. 

मराठा महासंघातर्फे 15 नोव्हेंबरला शनिशिंगणापूर (ता. नेवासा, जि. नगर) येथे राज्यातील पहिले शेतकरी-वारकरी संमेलन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार असून, राष्ट्रसंत बद्रिनाथ तनपुरे महाराज अध्यक्षस्थानी असतील. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आदर्श गाव योजना संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासह सर्व शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी, जिल्हाभरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि नगर, नाशिक, धुळे, जळगाव, बीड, आठ जिल्ह्यामधील पाच हजार वारकऱ्यांसह पन्नास हजार शेतकरी उपस्थित राहतीलस असे नियोजन केले आहे. 

त्याची माहिती देताना जगताप म्हणाले, दुष्काळाची सातत्याने अपत्ती येत आहे. तात्पुरत्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. मुळात सरकारने कायम दुष्काळाच्या झळा बसत असलेल्या भागातील तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळवून द्यावी, सरकारी नोकरी शक्‍य नसेल तर कंपन्यांना तसे बंधनकारक करावे. ज्याला नोकरी दिली त्याने आई-वडिलांसह कुटुंबाचा सांभाळ करण्याची हमी घ्यावी. तरच जगण्याची उमेद मिळेल आणि दुष्काळग्रस्ताची ओरड कमी होईल. 

याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना तसा प्रस्ताव देणार आहोत. अनेक मागण्यांबाबत संमेलनात सरकारपुढे मांडणार आहोत. राष्ट्रसंत तनपुरे महाराज मराठा भूषण पुरस्काराने संमेलनात दोन व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे. या वेळी संभाजी दहातोंडे, उद्धव वाळके महाराज, रमेश बोरुडे, श्‍यामराव पवार, संतोष नानावटे, अनिकेत कराळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

राज्यभर करणार प्रबोधन 
अनिल महाराज वाळके म्हणाले, संत, कीर्तन, प्रवचनकार समाजसेवकच आहेत. आता अध्यात्मासोबत शेतकऱ्यांना आत्महत्या करू नये, यासाठी राज्यभर सुमारे पाच हजारापेक्षा अधिक वारकरी प्रबोधन करतील. संकटावर मात करताना आत्महत्या करू नये, यासाठी आम्ही मन परिवर्तन करणार आहोत. राज्यात असा पहिलाच प्रयोग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com