मराठा महासंघाच्या वतीने गुणवंतांचा शिवगौरव पुरस्काराने सन्मान

mohol
mohol

मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्राातील गुणवंतांचा पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार देत  सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मोहोळ नागरी बँकेचे चेअरमन कौशिक गायकवाड होते.

यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी राजेंद्र वारगड, कृषी अधिकारी महेश शेळके, विजय परबत, नंदकुमार फाटे, सीमा पाटील, संगीता फाटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष काकासाहेब देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष सतीश काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, बाळासाहेब गायकवाड, प्रमोद डोके, डॉ. प्रमोद पाटील, मानाजी माने, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष तानाजी चटके, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शुभांगी लंबे, पिंटू काळे,गणेश जगताप आदी उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याबद्दल डॉ. स्मिता पाटील, विधिज्ञ पुरस्कार अॅड. हिंदुराव देशमुख, आदर्श पत्रकार बालाजी शेळके, आदर्श उद्योजक रामदास चवरे, सावित्रीबाई फुले पुरस्कार नूतन पी.एस.आय.रुक्मिणी माने, आदर्श शिक्षीका अनिता गाटे यांना देण्यात आले. यावेळी पो. नि. कोकणे  म्हणाले " राजे पुन्हा जन्माला या " असं लिहील्याने राजे जन्माला येत नाहीत , तर राजे घडावे लागतात त्यासाठी राजा बनविणारी मॉ जिजाऊ प्रत्येकाच्या घरात जन्माला आली पाहिजे . म्हणुन स्त्रीजन्माचे स्वागत करून प्रोत्साहन दया असे सांगत निधर्मि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची प्रेरणा घेऊन ध्येयवेडे होऊन समाजात काम करा. तरच अशा वर्धापन दिन, जयंती, पुण्यतिथी साजऱ्या केल्याचे सार्थक होईल. यावेळी  शहर व तालुक्यातील नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित  होते. प्रास्ताविक संतोष गायकवाड सर यांनी तर सुत्रसंचालन शुंभागी लंबे यांनी केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com