सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन

हुकूम मुलाणी
शनिवार, 21 जुलै 2018

मंगळवेढा (सोलापूर) : शांततामय मार्गाने मोर्चा व आंदोलन करूनही
 मराठा आरक्षण व विविध मागण्याकडे सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केल्यामुळे या समाजाच्या प्रलंबित मागण्या आषाढी एकादशी पूर्वी मान्य कराव्यात अन्यथा पुजेस येवू नये या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून येथील दामाजी पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. 

या आंदोलनास्थळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी मंगळवेढा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित जगताप, नगरसेवक राहुल सावंजी, वारी परिवारचे सतिश दत्तू, माजी उनगराध्यक्ष मुरलीधर दत्तू, सोमनाथ माळी, काका डोंगरे,विजय बुरकुल,संदीप फडतरे, चंदू काकडे आदि उपस्थित होते.दोन दिवसापुर्वी याच मागण्यावरून एसटी बसची मोडतोड करण्यात आली. आंदोलन स्थळी भाकरी खावून सरकारच्या दुर्लक्षाचा निशेध करण्यात आला.

Web Title: maratha morcha strike at mangalwedha