मराठा आरक्षणासाठी तळेगावात कडकडीत बंद

हरिभाऊ दिघे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

तळेगाव दिघे (जि.अहमदनगर) : सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी शांततेत तळेगाव दिघे ( ता. संगमनेर ) येथे कडकडीत बंद पाळला. चौफुली परिसरात सर्व दुकाने व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.

तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत ग्रामस्थ व व्यावसायिकांनी दुकाने, व्यवहार बंद ठेवले. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

प्रसंगी सरपंच बाबासाहेब कांदळकर, सचिन दिघे, रमेश दिघे, बाळासाहेब दिघे, तुकाराम दिघे, विकास गुरव, मतीन शेख, पोपट दिघे, चांगदेव दिघे, गणेश दिघे, काशिनाथ जगताप, संपत दिघे, निलेश दिघे, राहुल जगताप, देवीचंद दिघे, नानासाहेब दिघे, मच्छिंद्र दिघे, इसाक शेख, लतीफ शेख, सुनील जगताप, भाऊसाहेब दिघे, संतोष दिघे, शरद भागवत, लक्ष्मण दिघे, नंदू दिघे, अमजद शेख, अमोल दिघे, अक्षय दिघे, सुभाष जगताप, रावसाहेब दिघे उपस्थित होते. व्यवसायिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला. याबंदमध्ये सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते.

Web Title: For the Maratha reservation, the banana in Talegaon