मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल : सुशीलकुमार शिंदे

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 26 जुलै 2018

सोलापूर : "मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चर्चेतून मार्गी लागेल. या संदर्भात राज्य शासनाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा'', असे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. 

आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापुरात आंदोलन सुरु आहेत. रविवारी (ता.29) जागरण गोंधळ आणि सोमवारी (ता.30) सोलापूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा क्रांतीचे शिष्टमंडळाने आज शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. 

शिंदे म्हणाले,"हा प्रश्‍न चर्चा करून सोडविता येऊ शकतो. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकारने लिंगायत धर्मासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेतला आहे आणि अंतिम निर्णयासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली आहे. त्याच धर्तीवर मराठा आरक्षणासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेता येईल.'' 

क्रांती मोर्चातर्फे रविवारी आयोजिलेल्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचेही शिंदे म्हणाले. यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, दास शेळके, प्रताप चव्हाण, किरण पवार, श्रीकांत घाडगे, शशी थोरात, नाना मस्के, शेखर फंड, शाहू शिंदे, राम जाधव, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, बाळू गायकवाड, योगेश पवार, शिरीष जगदाळे, विशाल भांगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: maratha reservation problem solved after discussion said sushilkumar shinde