ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

रेठरे बुद्रुक - ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर येताना तुम्हाला भाजपची मदत कशी चालली? मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता भाजपच देईल, असा विश्‍वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवार, नारायण राणे यांनी आमचा पक्ष जातीयवादी असल्याचे सांगण्याची गरज नाही. हे लोकांना सांगायला गेलात, तर ते तुमची कपडे काढतील,’ असा इशाराही त्यांनी पवार व राणे यांचे नाव घेऊन केला. 

रेठरे बुद्रुक येथील ग. स. पवार व्यासपीठावर शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, ‘कृष्णा’चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, चिटणीस अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगरसेवक घनश्‍याम पेंढारकर, जगदीश जगताप, दयानंद पाटील, धोंडिराम जाधव आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना मोफत ऑनलाइन सातबारा उतारा देण्याची योजना कार्यान्वित केली. येत्या वर्षभरात राज्यातील सर्व जमीन सरकार मोजून हद्दी ठरवून देणार आहे. सर्वांची दुकानदारी बंद केल्यामुळे ते अस्वस्थ आहेत. जसे कुटुंब चालवताना एक न्‌ एक रुपयाची आपण काळजी घेतो. त्याप्रमाणे महाराष्ट्र सुजलाम व सुफलाम करण्यासाठी कुटुंब म्हणून आमचे सरकार चालले आहे. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत २६ पैकी २० जागी भाजपचा अध्यक्ष होईल.’

शेखर चरेगावकर, सुरेश भोसले, जगदीश जगताप, पैलवान आनंदराव मोहिते, संजय पवार यांची भाषणे झाली. सरपंच प्रवीणा हिवरे, उपसरपंच हणमंत धर्मे, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष व्ही. के. मोहिते यांनी स्वागत केले. आबा सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत धर्मे यांनी आभार मानले.

अतुल भोसले यांना महामंडळावर संधी?
२०१९ ला नक्की ज्यांच्या नावाआधी आमदार लागणार असे आमचे परममित्र अतुल भोसले, असा भाषणाच्या सुरवातीस उल्लेख केल्यानंतर भाषणामध्ये कऱ्हाड दक्षिणमधील एक न्‌ एक जागा भाजपच्या चिन्हावर लढा. येत्या एक ते दीड महिन्यात अतुल भोसले यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्याची संधी रेठरेकरांना मिळेल. हे मी आश्‍वासन देत नसून, झोपेत दिलेला शब्द पाळण्याची माझी संस्कृती मी जपणार आहे, असे पाटील म्हणाले.

Web Title: Maratha reservation without touch obc