साखळी ठिय्या आंदोलनाचे नऊ दिवस

हुकूम मुलाणी 
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या मागण्यासाठी सुरू असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सरकार पावले उचलत नसल्यामुळे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास आसूड ओढत आपला राग व्यक्त केला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

येथील दामाजी चौकात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोपर्डी प्रकरणातीला आरोपीला फाशी व्हावी, बहिणीला न्याय मिळावा, सरसकट कर्जमाफी व शेती मालाला हमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी आज ता. 1 ऑगस्ट पासून दामाजी चौकात ठिय्या आंदोलनास सुरू झाली. आमदार भारत भालके यांनी या आंदोलनास्थळी भेट देवून पाठींबा व्यक्त केला. याशिवाय कोळी समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले. आसूड आंदोलन प्रसंगी विठ्ठलचे संचालक भगीरथ भालके, शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत, नगरसेवक राहूल सावंजी, काका डोंगरे, सतीश दत्तु, आबा हेंबाडे, हर्षद डोरले, बलवान वाकडे, शिवाजी वाकडे, स्वप्नील फुगारे, आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या आंदोलनात शहरातील प्रभाग, तालुक्यातील 8 पंचायत समिती गण व विविध संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले. या समाजाच्या वतीने महाराष्ट्रात एकूण 58 मोर्चे काढण्यात आले तरीही शासनाने यावर ठोस निर्णय घेतला नाही. 9 ऑगस्ट ला स. 12 वा. दामाजी चौक ते प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन समाप्त होणार आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha Agitation in mangalvedha