मंगळवेढा: मराठा समजाच्या वतीने ठिय्या आंदोलन

हुकूम मुलाणी
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, सभापती प्रदीप खांडेकर, दर्याप्पा दत्तू यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, निवेदन देताना नगरसेवक राहूल सावंजी, सतीश दत्तु, प्रा.संतोष पवार, सिध्देश्वर जाधव, बलवान वाकडे, शिवराज दत्तु आदीसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवेढा : सकल मराठा समाजाच्या मागण्याबाबत सरकारकडून हालचाली होत नसल्यामुळे येथील दामाजी चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनात आज 443 जणांना रक्ताच्या अंगठा करून सदरचे निवेदन तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांना देण्यात आले. 

आज सहाव्या दिवशी सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने बघितले नसल्याचा संतापही यावेळी व्यक्त करण्यात आला. सध्या सकल मराठा समाजाच्या मागण्याबाबत शहर व ग्रामीण भागातील महिलांसह समाजाचे कार्यकर्ते उपस्थिती दर्शवित या आंदोलनात पाठींबा व्यक्त करत आहेत.

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे, उपाध्यक्ष आंबादास कुलकर्णी, लक्ष्मण जगताप, सभापती प्रदीप खांडेकर, दर्याप्पा दत्तू यांनी आंदोलनस्थळी भेट दिली, निवेदन देताना नगरसेवक राहूल सावंजी, सतीश दत्तु, प्रा.संतोष पवार, सिध्देश्वर जाधव, बलवान वाकडे, शिवराज दत्तु आदीसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: MarathaKrantiMorcha agitation in Mangalwedha