#MarathaKrantiMorcha सोलापूर-कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन

प्रशांत माळी
रविवार, 22 जुलै 2018

आंधळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवानी राज्यभरात मुख मोर्चे काढले मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अदयाप सुटलेला नाही. अाता पर्यंत राज्यभरात मराठा अरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मुक मोर्चा निघाले तरी मराठाचा मुक आक्रोष सरकारला समजला नाही. सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतले गेले नाही.
याचाच उद्रेक म्हणून मुक मोर्चचे रूपातर ठोक मोर्चा मध्ये झालेचे दिसून येत आहे.

आंधळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा बांधवानी राज्यभरात मुख मोर्चे काढले मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न अदयाप सुटलेला नाही. अाता पर्यंत राज्यभरात मराठा अरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मुक मोर्चा निघाले तरी मराठाचा मुक आक्रोष सरकारला समजला नाही. सरकारने कोणतेही ठोस निर्णय घेतले गेले नाही.
याचाच उद्रेक म्हणून मुक मोर्चचे रूपातर ठोक मोर्चा मध्ये झालेचे दिसून येत आहे.

पंढरपूर आषाढीच्या पर्श्वभूमीवर सर्वत्र जक्का जाम अदोलन सूरू असून सकल मराठा समाजा कडून गणेशवाडी (ता .मंगळवेढा) येथे सोलापूर- कोल्हापूर या महामार्गवरील गणेशवाडी बसस्थनका समोर २ तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या मुळे माहामार्गवरील प्रवाशांची गैरसोयी झाली. गणेशवाडी हे सोलापूर - कोल्हापूर या मार्गावरील गाव असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर,सातार जाणारी वाहतुक विस्कळीत झाली.

मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे. अशा आशयाचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने प्रशासनाला देण्यात आले. या आंदोलनामध्ये गणेशवाडी परिसरातील आंधळगांव, अकोला, शेलेवाडी येथिल ग्रामस्थ मोठया प्रमाणात उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज कि जय..., एक मराठा लाख मराठा....., कोण म्हणतय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही..... आरक्षण आमच्या हाक्काच, नाही कुणाच्या बापाच......, अशा संप्तत घोषणा मराठा समाज बांधवाकडून करण्यात आली .

संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, यांच्यासह विविध संघटनेचे कार्याकते रस्तारोकोमध्ये सहभागी होते. पोलिस प्रशासन या ठिकाणी हजर राहून परिस्थिती तणावपूर्ण होउ नये म्हणून काळजी घेतली .

यामध्ये संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष पंकज चव्हाण, छावा संघटना उपाध्यक्ष मनोज चव्हाण, सतोष मिसाळ, सुखदेव नागणे, समाधान दत्तू, नागेश पाटील, अनिल चव्हाण, बाळू गायकवाड, बंडू माळी, सिध्देश्वर कदम, मोहन चव्हाण, समाधान शिंदे, प्रदिप चव्हाण, अनिल मोरे, नानासो चव्हाण, नाना तानगावडे, साधू चव्हाण, यांच्यासह मोठया प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #MarathaKrantiMorcha agitation stoping way to solapur kolhapur road