#MarathaKrantiMorcha सांगली जिल्हा सोमवारी बंद ठेवण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

सांगली - मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेवूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यात यावे. अन्यथा सोमवारी ( ता. 30) जिल्हा बंद आणि शहरात निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतिश साखळकर, राहूल पवार यांनी आज येथे दिला. 

सांगली - मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश घेवूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली जिल्ह्यात यावे. अन्यथा सोमवारी ( ता. 30) जिल्हा बंद आणि शहरात निदर्शने करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, सतिश साखळकर, राहूल पवार यांनी आज येथे दिला. 

ते म्हणाले," मराठा आरक्षण मागणीसाठी गेली वीस वर्षे लढा सुरु आहे. आताच ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत म्हणून आंदोलन केले जात नाही. यापूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना पुरंदर येथे त्यांचे हेलिकॉप्टर त्याच मागणीसाठी फोडले होते. गेली दोन वर्षे मराठा क्रांतीच्या नावाने आंदोलन सुरु आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत सहानुभूती न दाखवता त्यानी समाजाला खिजवण्याचा उद्योग सुरु केला. मराठा आरक्षणासाठी पंढरपुरला आल्यास आडवण्याच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्र्यांनी मला झेड सुरक्षा आहे. माझ कोण वाकडं करतंय. वारीत साप सोडणार अशी विधाने केली. मंत्री चंद्रकात पाटील यांनी तर आंदोलन पेड आहे, त्यास समाजकंटक घुसलेत. केवळ स्टंटबाजी म्हणून आंदोलन सुरु आहे. यामुळे राज्यभर समाज चिडून आंदोलनात उतरला आहे.'' 

ते म्हणाले,"" मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शुक्रवारचा आष्टा दौरा रद्द केला आहे. आता सोमवारी ते सांगली, मिरजेत प्रचार सभेसाठी येणार आहेत. त्या दिवशी मराठा क्रांती तर्फे संपूर्ण जिल्हा बंद राहिल. सांगली, मिरज, कुपवाड हद्दीत फक्त निदर्शने होतील. निवडणुकीसाठीची आचारसंहिता संपल्यानंतर सांगलीतही मोठे आंदोलन उभारले जाईल. जिल्ह्यातील मराठा खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावी.'' 

Web Title: MarathaKrantiMorcha Appeal to be closed on Monday in Sangli district