#MarathaKrantiMorcha माचणुर चौकात चक्का जाम आंदोलन; सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना घेरले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चक्का जाम अांदोलन सुरू असून सकल मराठा समाजाच्या वतीने माचणुर (ता. मंगळवेढा) येथे सोलापूर- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गवरील चौकामधे दोन तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलनकर्त्यांनी घेरले.

ब्रह्मपुरी : पंढरपूर आषाढीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चक्का जाम अांदोलन सुरू असून सकल मराठा समाजाच्या वतीने माचणुर (ता. मंगळवेढा) येथे सोलापूर- कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गवरील चौकात दोन तास रस्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आंदोलनकर्त्यांनी घेरले व त्यांच्या वाहनास चौकात अडविल्यामुळे या महामार्गवरील प्रवाशांची गैरसोय झाली.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना त्वरित फोन केला व मराठा समाजाच्या आरक्षण सोडविण्यात येईल, या समाजाच्या पाठीशी आमचे सरकार राहील अशी ग्वाही देऊन चक्का जाम आंदोलनातून सुटका करुन घेतली.

या आंदोलनामुळे प्रवासी, माल वाहतूक विस्कळीत झाली होती. या आंदोलनात ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय..., एक मराठा लाख मराठा....., कोण म्हणतंय देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही..... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं.....अशा घोषणा मराठा समाज बांधवांकडून यावेळी देण्यात आल्या. 
 

Subhash Deshmukh

यावेळी विजयसिंह पाटील, संजय पाटील, राजन पाटील, सुनील डोके, विट्ठल डोके, भारत पाटील, महादेव सरवले, सुनील डोके,कल्लप्पा डोके, महादेव फराटे, धनञ्जय गाइकवाड, दत्ता रने, सचिन कलुबरमे, विजयराज कलुबरमे, आबासाहेब डोके, लिम्बाजी डोके, विविध संघटनेचे कार्याकर्ते रस्तारोकोमध्ये सहभागी होते. पोलिस प्रशासनाने या ठिकाणी हजर राहून परिस्थिती तणावपूर्ण होउ नये म्हणून काळजी घेतली. यांच्यासह मोठया प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते.

Subhash Deshmukh

Subhash Deshmukh

#MarathaKrantiMorcha ...तर मुख्यमंत्र्यांना 'वर्षा'वरच बसावे लागेल? 
#MarathaKrantiMorcha मुख्यमंत्र्यांची ‘सबुरी’.... पण काहीतरी चुकतंय....!
#MarathaKrantiMorcha क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद, लातुरच्या बैठकीत निर्णय

#MarathaKrantiMorcha मराठा समाजाचे ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरूच
#MarathaKrantiMorcha बांध फुटतोय मोर्चातील संयमाचा
#MarathaKrantiMorcha औरंगाबादेतून घोंगावणार मराठा मोर्चाचे वादळ

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MarathaKrantiMorcha Chakka Jam Aandolan At Manchur Chauk Maratha Reservation Aandolan Solapur