#MarathaKrantiMorcha आंदोलनादरम्यान अंगावर रॉकेल ओतून घेतले

किरण चव्हाण
शनिवार, 28 जुलै 2018

माढा : माढा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान एकाने अंगावर रॅाकेल ओतून घेतले. यावेळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरही दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

माढा : माढा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान एकाने अंगावर रॅाकेल ओतून घेतले. यावेळी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरही दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

माढ्यातील तहसिल कार्यालयासमोर मराठा आरक्षणासाठी पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. शऩिवारी (ता.28) माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी चक्का जाम आंदोलन करताना तानाजी पाटील या आंदोलकाने अंगावर रॅाकेल ओतून घेतले. पोलिस व काही आंदोलकांनी वेळीच त्यांना रोखले. सकल मराठा समाजाने गाव तिथे चक्का जाम आंदोलन पुकारल्याने माढा तालुका ठप्प झाला होता. टेंभूर्णी येथेही राष्ट्रीय महामार्गावर दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. 

दारफळ, उपळाई खुर्द, अंजनगाव खेलोबा, म्हैसगाव, केवड, उंदरगाव, जामगाव, मानेगाव यासह माढा तालुक्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. माढा तालुक्यातील आंदोलनाची धार वाढली असून तहसिल कार्यालयासमोर पाच दिवांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला सर्व स्तरातून व विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे.

Web Title: MarathaKrantiMorcha During the agitation, the kerosene was taken out