#MarathaKrantiMorcha आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा

संजय जगताप
बुधवार, 25 जुलै 2018

मायणी : आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा. अशा जळजळीत व उद्विग्न घोषणा देत आज येथे मराठा बांधवांनी क्रांती ठोक मोर्चा काढला. मोर्चानंतर येथील चाँदणी चौकात रास्ता रोको दरम्यान टायर पेटविण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. मात्र उद्रेक होण्याआधीच जेष्ठ कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भुमिका घेतल्याने आंदोलनाला गालबोट लागले नाही.  

मायणी : आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा. अशा जळजळीत व उद्विग्न घोषणा देत आज येथे मराठा बांधवांनी क्रांती ठोक मोर्चा काढला. मोर्चानंतर येथील चाँदणी चौकात रास्ता रोको दरम्यान टायर पेटविण्यास पोलिसांनी मनाई केल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. मात्र उद्रेक होण्याआधीच जेष्ठ कार्यकर्त्यांनी सामंजस्याची भुमिका घेतल्याने आंदोलनाला गालबोट लागले नाही.  

मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे. आरक्षण जाहीर झाल्याशिवाय शासनाने 72 हजारांची मेगा नोकरभरती करु नये. आदी मागण्या करीत महाराष्ट्र बंदच्या हाकेला मायणीकरांनी प्रतिसाद देत आज कडकडीत बंद पाळला. बंदच्या पार्श्वभुमीवर येथील 
य़शवंतबाबा मंदिरात प्रमुख कार्यकर्त्यांची बेठक होऊन आंदोलन शांततेने पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. कालच (ता. 24) सर्व व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले. त्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले. परिणामी बाजारपेठतील सर्व दुकाने व्यापाऱ्यांनी सकाळपासुन उघडलीच नाहीत. मोर्चासाठी सकाळी नऊ वाजल्यापासुनच येथील चांदणी चौकात कार्यकर्ते गोळा होऊ लागले.

दहाच्या सुमारास छत्रपती शिवरायांच्या मुर्तीला अभिवादन करुन, शहीद काकासाहेब शिंदेंना श्रद्धांजली अर्पण करुन मोर्चास सुरवात झाली. गावातील मुख्य मार्गाने बाजारपेठेतुन मोर्चा चांदणी चौकात आला. तेथे सुमारे दोन तास मोर्चेकरी ठिय्या मारुन बसले. त्यावेळी डाॅ. सयाजीराव पवार, धोंडीराम थोरात, संजय चव्हाण, जनार्दन देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. चौकातील मिरज-भिगवण व मल्हारपेठ पंढरपुर राज्य मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी काही आंदोलकांनी हाॅटेल बहार समोर टायर पेटवला. त्यास मनाई करण्यामुळे पोलिस व आंदोलकांत शाब्दिक चकमक झाली. काही काळ तणाव निर्माण झाला.

मात्र संतापलेल्या आंदोलक व कार्यकर्त्यांकडुन अविचाराने उद्रेक होऊ नये. याची काळजी घेत डाॅ. पवार व अन्य जेष्ठ समन्वयकांनी पुढाकार घेत शांततेचे आवाहन केले. मुख्यमंत्री व शासनकर्त्यांनी मराठा समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. असा सज्जड इशाराही त्यावेळी मोर्चेकऱ्यांनी दिला. दरम्यान, आज सर्व प्रकारचे मतभेद विसरुन, राजकीय गटा-तटांच्या भिंती पार करुन सर्वपक्षीय मराठा कार्यकर्ते एकत्र आले होते. कडकडीत बंदमुळे नेहमी वर्दळ असलेले बसस्थानक, चांदणी चौक व मुख्य बाजारपेठेत दुपारच्या वेळी चिटपाखरुही निदर्शनास आले नाही. त्याचबरोबर शाळा-विद्यालयेही आज बंद असल्याने वर्दळीच्या ठिकाणीही स्मशान शांतता अनुभवास आली.
 

Web Title: #MarathaKrantiMorcha either give reservation or leave the chair