#MarathaKrantimorcha मंगळवेढ्यात सरकारची प्रेतयात्रा, ठिय्या आंदोलन सुरुच

हुकूम मुलाणी
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - सकल मराठा समाजाच्या वतीने  मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसा पासून येथील दामाजी चौकामध्ये सुरू असलेल्या साखळी ठिय्या आंदोलनातील  सहाव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार चालढकल करत असल्याचा निषेधार्थ शेकडो सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दामाजी चौक ते चोखामेळा चौकापर्यंत सरकारची प्रेतयात्रा काढून श्राद्ध घातले.

एक ऑगस्ट पासून दामाजी चौकात आंदोलन सुरूच असून वेगवेगळ्या माध्यमातून आरक्षणाचा लढा सुरू आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा घोषणा देण्यात आल्या आणि शासनाचा निषेध करण्यात आला. 

१७ महिने झाले तरी हे सरकार मागासवर्गीय आयोगालाच पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. बेमुदत ठिय्या आंदोलनात आतापर्यंत विविध मार्गांनी कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सरकारने आडमुठी भूमिका घेतल्यास आमचा आडमुठेपणा तुम्हाला परवडणारा नसेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Web Title: MarathaKrantimorcha The funeral of the government in the Mangaldha