#MarathaKrantiMorcha मोहळ तालुक्यातही एसटीची तोडफोड

राजकुमार शहा 
मंगळवार, 24 जुलै 2018

मोहोळ : मराठा आरक्षण मागणीची ठिणगी आता मोहोळ तालुक्यातही पडली असून आज दुपारी राज्य परिवहन विभागाच्या बसच्या अंकोली शिवारात अज्ञातांकडुन काचा फोडण्यात आल्या आहेत.

मोहोळ : मराठा आरक्षण मागणीची ठिणगी आता मोहोळ तालुक्यातही पडली असून आज दुपारी राज्य परिवहन विभागाच्या बसच्या अंकोली शिवारात अज्ञातांकडुन काचा फोडण्यात आल्या आहेत.

मराठा आरक्षण मागणी साठी आज ठीक ठिकाणी बंद पाळण्यात आला. मात्र मोहोळ मधील सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास सोलापूर आगाराची सोलापूर पंढरपूर ही बस क्र (एमएच 12 सीएच 7790) ही पंढरपूर कडे जाताना अंकोली शिवारातील पवार फाट्याजवळ येताच दहा ते पंधरा जणांच्या जमावाने हुल्लडबाजी करीत बसच्या समोरील व बाजुच्या काचा फोडुन पळ काढला. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही या घटनेची नोंद उशीरा पर्यत पोलीसात झाली नव्हती.

Web Title: #MarathaKrantiMorcha Harm to ST bus in Mohol Taluka