#MarathaKrantiMorcha कोल्हापूर - सकल मराठा समाजाच्या बंदला संमिश्र प्रतिसाद 

Morcha
Morcha

कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज (मंगळवार) जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  

कोल्हापूर शहर परिस्थिती 
शहरात सकाळ पासूनच बंद सदृश्य परिस्थिती मिळाली. अनेकांनी आपली दुकाने स्वतःहून बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. रिक्षा. केएमटी बंद झाल्यामुळे शाळा व महाविद्यालयाना सुट्टी देण्यात आली. शहरातील प्रमुख ठिकाणाची दुकाने, बाजारपेठ बंद करण्यात आली. अनेक पालकांनी पाल्यांना शाळेतून घरी घेऊन गेले.      

एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, या जयघोषात सकल मराठा समाजातर्फे काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीने शहरातील दुकाने आज पटापट बंद झाली. दसरा चौकातून दुपारी बारा वाजता या फेरीस सुरुवात झाली. हातात भगवे व झेंडे डोक्यावर भगव्या टोप्या घातलेल्या तरुणांनी चौकातून एल्गार केला. कोंडा ओळ, उमा टॉकीज, टेंबे रोड, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड पापाची तिकटी यामार्गे ही फेरी काढण्यात आली. यावेळी दुचाकीवरील तरुणांचा गट बघून काही दुकाने पटापट बंद करण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक, शिवाजी रोड, बिंदू चौक, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा ते पुन्हा दसरा चौक असा फेरीचा मार्ग राहिला.

दसरा चौकामध्ये सकल मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात आली. शहरातील विविध ठीकाणाहून मोर्चेकरी या ठिकाणी दाखल झाले. दसरा चौकात हजारो लोक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत    

जिल्ह्यातील तालुक्यांची स्थिती
 
कागल  
मोर्चा शांततेत असला तरी शाळा महाविद्यालये व दुकाने बंद. 

राधानगरी 
बंद ला संमिश्र प्रतिसाद असुन अनेकांनी व्यवहार बंद ठेवून बंद ला पांठिबा दिला. तालुक्‍यातील एस.टी सेवासुरळीत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तेथील जनजीवन सुरळीत सुरू आहे. 

मुद्दाळ तिट्टा 
जमावाकडून सकाळी सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आले. येथील दुकाने उस्फुर्तपणे बंद ठेवण्यात आली. शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली. 

बिद्री 
मराठा समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. हा मुक मोर्चा नाही तर आता ठोक मोर्चा अशा घोषणा देत बंद रास्ता रोको करण्यात आला. सुमारे तास भर रास्ता रोको केल्यानंतर मुरगुड पोलिसांकडून वाहतुक सुरळीत करण्यात आली. 

शिरोळ 
 शिरोळ एसटी स्थानकावर थांबलेल्या ५ एसटीची तोडफोड करण्यात आली. एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, अनेकांनी व्यवहार बंद ठेऊन आंदोलन पाठिंबा दिला. 

पन्हाळा 
 एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून गडावरील पर्यटन थांबले आहे. परिसरातील संपूर्ण व्यवहार तुरळ्क प्रमाणत सुरु आहेत.     

गडहिंग्लज 
 एसटी बंदमुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. व्यवहार बंद असून आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. 

अजरा
  व्यवहार बंद असून एसटीच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहते. शाळा आणि महाविद्यालय सुरळीत सुरु आहेत.

चंदगड 
  हलकर्णी फाटा बंद करण्यात आला असून बाजारपेठ पूर्णतः बंद करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com