#MarathaKrantiMorcha कुडाळ व करहर बंदला शंभर टक्के प्रतिसाद  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

कुडाळ - मराठा समाजाच्या वतीने आज जावळी बंदची हाक दिली होती, याला कुडाळ व करहर या दोन्ही ठिकाणाहून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून मराठा समाजातील बांधवांनी मराठा मोर्चाच्या दरम्यान आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे या मराठा युवकाला श्रध्दांजली अर्पण केली.  

मराठा समाजाच्या आरक्षणावरून काकासाहेब शिंदे या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेचे पडसाद संपुर्ण जावळी तालुक्यात उमटले. बुधवारी संपुर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांचा महत्वाचा बेदुंर सण बुधवारी असल्याने 
जावळी तालुक्यातील बाजारपेठा सूरू ठेवण्याचा निर्णय मराठा समाजाकडून घेण्यात आला होता. तर गुरूवार ता. 26 रोजी मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जावळी बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज संपुर्ण जावळी तालुक्यात कडकडीत बंद पाळण्य़ात आला. यावेळी कुडाळ व करहर येथील व्यापाऱ्यांनी स्वयंम स्फुर्तीने दुकाने बंद ठेवली. 

दरम्यान, आजच्या बंदमध्ये जावळी तालुक्‍यातील शाळा, महाविद्यालय, दवाखाने, मेडीकल, अत्यावश्‍यक सेवा सुरळीत सुरू होती. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी मराठा मोर्चाच्या कार्यकत्यांनी घेतली होती. कालपासूनच ग्रामीण भागात जावळी बंद बाबत माहिती मिळाल्याने संपूर्ण बाजारपेठेत शांतता होती. जावळी 
बंदच्या काळात कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज होते. मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Web Title: MarathaKrantiMorcha kudal and Karwar band hundred percent response