#MarathaKrantiMorcha मराठा क्रांतीचे जिल्ह्यात ठोक आंदोलनाचे नियोजन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

सांगली - मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण यांसह विविध मागण्यांकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत आहे. शासनाविरोधात राज्यभर उद्रेक होतो आहे. सांगली महापालिका निवडणूक पार्श्‍वभूमीवर तशी शहरात शांतता आहे. तालुक्‍यातून आंदोलनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इस्लामपूर, तासगाव, कवठेमहांकाळ येथील बैठका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात धरणे, रास्ता रोका आणि त्यानंतर आंदोलनाची तीव्रता वाढण्यात  येईल, अशी चर्चा सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चातील जहाल गट मात्र ठोक आंदोलन करण्याच्या मन:स्थितीत आहे. जिल्ह्यात कोणत्याही क्षणी आंदोलनाची ठिणगी पडेल, असे वातावरण आहे.  

मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्यभरात ९ ऑगस्ट क्रांती दिनी राज्यबंदचा इशारा देण्यात आला आहे. ३ ऑगस्टरोजी माहपालिकेची मतमोजणी झाल्यानंतर त्या आंदोलनावेळी सांगली शहरातही जोरकस आंदोलनाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

मराठा समाजाने आजपर्यंत ५८ मूक मोर्चे काढूनही  मराठा समाजाच्या पदरात काहीच पडले नाही. त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.  त्याचा उद्रेक कधी होईल, हे सांगता येत नाही. आजपर्यंत जे शासन आदेश निघाले, ते केवळ कागदावरच असून मराठा समाजाला त्याचा फारसा उपयोग होत नाही, अशी भावना समाजात पसरली आहे. परिणामी मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व हाती घेतले आहे. त्याची सुरवात राज्यात झाली आहे. सांगलीतही मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे.

प्रमुख मागण्या...
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठीच्या जाचक अटी रद्द  कराव्यात, विनाअट कर्ज ताबडतोड मिळावे, प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह उभारावे, शासनाने जाहीर केलेली शैक्षणिक सवलत प्रवेश घेतानाच मिळावी, बेरोजगार तरुण-तरुणींना बेरोजगार भत्ता वाढवून द्यावा, शासकीय नोकरभरती (७२ हजार जागा) मराठा आरक्षण मिळेपर्यंत स्थगित करावी आदी मागण्यांचा समावेश  आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation