#MarathaKrantiMorcha फसवाल तर ताकद दाखवू

कोल्हापूर - सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी दसरा चौकात केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या वेळी व्यासपीठावर दिलीप देसाई, वसंत मुळीक, गणी आजरेकर, रणजित जाधव, किशोर घाटगे, सुरेश साळोखे, भगवान काटे.
कोल्हापूर - सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी दसरा चौकात केलेल्या ठिय्या आंदोलनावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. या वेळी व्यासपीठावर दिलीप देसाई, वसंत मुळीक, गणी आजरेकर, रणजित जाधव, किशोर घाटगे, सुरेश साळोखे, भगवान काटे.

मराठा समाजाचा इशारा; ठिय्या आंदोलन, घोषणांनी दसरा चौक दणाणला
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विराट मोर्चे निघाले, सरकारने आरक्षण देण्याऐवजी तोंडाला पाने पुसण्याचे काम केले, अशा सरकारला मूक मोर्चाने नाही तर ठोक आंदोलनाने जाब विचारत आहोत, तरीही सरकारने फसवणूक केल्यास मराठा समाज ताकद दाखवेल, तेव्हा सरकारची पळताभुई थोडी होईल, असा इशारा मराठा समाज क्रांती मोर्चाने आज येथे ठिय्या आंदोलनातून दिला.

मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी सरकारकडून होणाऱ्या चालढकलीविषयी तीव्र भावना या वेळी व्यक्त झाल्या.

‘मराठा आरक्षण द्यायलाच लागतेय’ इथंपासून ‘आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशा घोषणांनी दसरा चौक दणाणून गेला.  

आरक्षण देण्याचे सरकारने दिलेले आश्‍वासन पाळलेले नाही. याचा निषेध म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर कोल्हापुरातील दसरा चौकात मराठा समाजातर्फे ठिय्या आंदोलन सुरू झाले. मराठा नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढविला.

या वेळी शाहीर दिलीप सावंत यांनी बुलंद शाहिरीद्वारे मराठा आंदोलनाला ऊर्जा देणारे पोवाडे सादर केले. मराठा महासंघाचे वसंत मुळीक, उपमहापौर महेश सावंत, ॲड. गुलाबराव घोरपडे, नगरसेविका सुरेखा शहा, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, उद्योजक जयेश कदम, महादेव पाटील, उदय भोसले, किशोर घाटगे, राजू सावंत, दिलीप पाटील, उमेश पाटील, स्वप्नील पार्टे, दीपा पाटील, सरिता मोरे आदी उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत भाजपची भूमिका संशयास्पद आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून तोंडाला पाने पुसण्याचे काम सुरू आहे.
- सतेज पाटील, आमदार  

मराठा समाजाच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत. हा समाज अडचणीत आहे. आम्ही या समाजासोबत आहोत.
- राजेश क्षीरसागर, आमदार 

मराठा हे लढाऊ आहेत. शांतता व लढाऊ बाणा हे समीकरण जुळत नाही. मराठ्यांनी शांततेने मोर्चे काढले. तरीही शासनाने आरक्षण दिलेले नाही. यातून समाजाच्या सहनशीलतेला तडा जाईल, तेव्हा समाज पेटून उठेल.
- जयंत पाटील, नगरसेवक 

मराठा समाज अनेक वर्षे आरक्षणाची मागणी करीत आहे. मात्र, सरकारने आरक्षण दिले नाही. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय नाही. मराठा समाज हाक मारेल, तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीनिशी सहभागी होईल.
- भगवान काटे, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

असा झाला उद्रेक
 रंकाळा परिसरात टायर पेटवून ‘रास्ता रोको’ 
 आंदोलनकर्त्या तरुणांना ताब्यात घेऊन सोडले 
 शिरोळ तालुक्‍यात दोन बसगाड्यांवर दगडफेक 
 इचलकरंजीत उत्स्फूर्त प्रतिसाद
 हातकणंगलेत ‘रास्ता रोको’
 जयसिंगपुरात कडकडीत ‘बंद’
 ‘गडहिंग्लज बंद’ची उद्या हाक
 आजरा, चंदगडला प्रतिसाद
 दुपारनंतर कोल्हापूर पूर्ववत 

राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिले. आजही मराठा समाज आरक्षणासाठी मागणी करतोय ती सरकारपर्यंत पोचली आहे. मात्र, अद्याप मागणी मान्य न झाल्याने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकार मनापासून प्रयत्न करीत नाही. भविष्यातील या परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन आरक्षणासाठी आंदोलनाची पावले उचलावी लागतील.
- श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com