#MarathaKrantiMorcha जातीपाती पलीकडे जाऊन आंदोलकांना मदत!

हेमंत पवार
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - मराठा समाजातील महिलांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून येथील दत्त चौकात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, तेथे येणाऱ्या महिलांसह आबालवृद्धांच्या चहा नाष्ट्याची मोफत सोय जातीपातीच्या भिंती तोडून एक उडपी हॉटेल मालक करत आहे. स्वतः उडपी असूनही ज्या मातीत आपण राहतो, व्यवसाय करतो, त्या मातीचे ऋण समाजाला दान करून फिटावे या उद्दात हेतूने आंदोलनस्थळी येणाऱ्यांना सात दिवसांत सुमारे २५ हजारांचा चहा- नाष्टा मोफत देऊन हॉटेलचे मालक लक्ष्मीनारायण सरलय्या यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

कऱ्हाड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दत्त चौकात लक्ष्मीनारायण सरलय्या यांच्या वडिलांनी १९४८ मध्ये हॉटेल गजानन सुरू केले. आजही ७० व्या वर्षी ते चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 

अत्यंत खडतर परिस्थितीतून हॉटेलचा व्यवसाय करून लक्ष्मीनारायण यांच्या वडिलांनी हॉटेलचा चांगलाच जम बसवला. तोच जम टिकवून ठेवण्याचे काम लक्ष्मीनारायण व त्यांचे सहकारी करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात मिसळसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. विविध ठिकाणाहून मिसळ खाण्यासाठी लोक तेथे येतात. अत्यंत नीटनेटकेपणा, लोकांना खाऊ घालण्यासाठीची आस्था, चांगली सेवा यामुळे ते प्रसिद्ध आहे. हॉटेलच्या व्यवसाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीतून सातत्याने श्री. लक्ष्मीनारायण हे मदत करतात. मराठ्यांना आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा समाजातील महिलांनी येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गेल्या सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या वेळी तेथे आंदोलनासाठी येणाऱ्या महिलांसह आबालवृद्धांच्या चहा- नाष्ट्याची सोय मी करणार असे तेथे येऊन स्वतः लक्ष्मीनारायण यांनी समन्वयकांना सांगितले. जोपर्यंत आंदोलन सुरू आहे, तोपर्यंत चहा- नाष्टा मोफत देण्याचे त्यांचे धाडस पाहून समन्वयकही आवाक झाले. दातृत्वाच्या भावनेतून त्यांनी आतापर्यंत सात दिवसांत सुमारे २५ हजार रुपयांचा चहा- नाष्टा मोफत दिला आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या भूमीत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्दात हेतूने मी मराठा आंदोलकांना एक रुपयाही न घेता चहा- नाष्टा देत आहे. हे मी माझे कर्तव्य समजतो. यापुढेही मदत करणार आहे.
- लक्ष्मीनारायण सरलय्या  

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation Laxminarayan Sarlayya