#MarathaKrantiMorcha वाळवा, शिराळ्यात आंदोलन पेटले; मांगल्यात एसटी जाळली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नवेखेड - वाळवा, शिराळा तालुक्‍यात मराठा आरक्षण मोर्चाची धग आज सकाळपासून वाढली. एसटी बसला लक्ष करीत आंदोलकांनी तोडफोड केली. तर शिराळा तालुक्‍यातील मांगले येथे जमावाने एसटी बस पेटवल्याने शिराळा तालुक्‍यातही तणावाचे वातावरण आहे. अनेक गावात उत्स्फूर्त बंद पाळला जात आहे. 

नवेखेड - वाळवा, शिराळा तालुक्‍यात मराठा आरक्षण मोर्चाची धग आज सकाळपासून वाढली. एसटी बसला लक्ष करीत आंदोलकांनी तोडफोड केली. तर शिराळा तालुक्‍यातील मांगले येथे जमावाने एसटी बस पेटवल्याने शिराळा तालुक्‍यातही तणावाचे वातावरण आहे. अनेक गावात उत्स्फूर्त बंद पाळला जात आहे. 

मांगलेत जमावाने सकाळी सोडेदहा -अकराच्या सुमारास बस पेटवली यात बस जळून खाक झाली आहे. गेले दोन दिवस शांततेच्या मार्गाने सुरु असलेले शिराळा, वाळवा तालुक्‍यातील आंदोलन आज तोडफोडीचे लक्ष्य बनले. एसटीला लक्ष्य केल्याने प्रवासी भयभीत झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता ताकारी - इस्लामपूर रस्त्यावर इस्लामपूरकडे येणाऱ्या पलूस-इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष-इस्लामपूर या इस्लामपूर व पलूस आगाराच्या तीन बस आंदोलकांनी शिंदे मळा ते वीट भट्टी या दरम्यान फोडल्या. दुचाकीवरुन आलेल्या सहा लोकांना हे कृत्य केल्याचे चालकाने सांगितले. एका दुचाकीस्वाराने गाडीला हात करुन गाडीला बाजूला घेत चालकाशी बोलायचा बनाव करत इतर चौघांनी दगडांचा मारा बसवर गेला. त्यात एसटीच्या पाठीमागील मोठ्या दोन काचा व बाजूच्या खिडक्‍या फुटल्या.

खळ्ळखट्याकच्या आवाजाने प्रवासी भयभीत झाले. त्यांनी दरवाजा उघडून खाली धाव घेतली. घटनास्थळावर बघ्यांनी गर्दी केली होती. चालक वाहकांनी इस्लामपूर आगार व पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. दरम्यान शिराळा तालुक्‍यात आंदोलकांनी एसटीला लक्ष्य करीत मांगलेमध्ये एसटी बस पेटवल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने एसटीच्या अधिकाऱ्यांनी संबंधीत मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद केली. एसटी फोडणारे हे आंदोलक आहेत का अन्य कोण याची चर्चा आहे. या घटनेची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दरम्यान इस्लामपूर आगाराने चिकुर्डे व ताकारी मार्गावरील एसटी बस बंद केल्याने त्या गावांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी बसस्थानकात गर्दी केली होती.

Web Title: #MarathaKrantiMorcha maratha reservation agitation ST Fire