सातारा: आंदोलकांच्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून सातारा शहरातील राजवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही कार्यकर्ते महामार्गावर वाहतूक बंद करण्यासाठी गेले. बॉम्बे रेस्टॉरंटच्या पुलाजवळ आंदोलनकर्ते गेल्यानंतर पोलिसांची कुमकही त्याठिकाणी दाखल झाली.

सातारा : सातारा शहरात आज (बुधवार) मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. बंगळूर-मुंबई महामार्गावर सातारा शहराजवळील बॉम्बे रेस्टॉरंट येथे आंदोलकांकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलिस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले असून, त्यांच्यासह अन्य काही पोलिसही जखमी आहेत. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
 
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून सातारा शहरातील राजवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही कार्यकर्ते महामार्गावर वाहतूक बंद करण्यासाठी गेले. बॉम्बे रेस्टॉरंटच्या पुलाजवळ आंदोलनकर्ते गेल्यानंतर पोलिसांची कुमकही त्याठिकाणी दाखल झाली. जोरदार घोषणाबाजी सुरु असताना पोलिसांकडून जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. त्यामुळे आंदोलन कर्त्यांकडून पोलिसांवर जोरदार दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. 

या दगडफेकीत पोलिस अक्षीक्षक संदीप पाटील आणि काही पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याबरोबरच वाडाफाटा येथेही पोलिसांच्या गाड्यांची आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आली. 

Web Title: MarathaKrantiMorcha Police SP Sandip Patil injured in stone pelting at Satara