#MarathaKrantiMorcha ब्रह्मपुरीमधे रास्ता रोको आंदोलन

दावल इनामदार
शनिवार, 28 जुलै 2018

ब्रह्मपुरी (सोलापूर) : सकल मराठा समाजाच्या वतीने आज शनिवार( ता.28) रोजी मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूर-कोल्हापुर या प्रमुख महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे रास्ता रोको आंदोलन केले. समाजाच्यावतीने छत्रपती चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रधांजली वाहण्यात आली. सकाळी 9 ते 11 महामार्गावरील दोन तास रस्ता रोको करुण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या भूमिकेविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

या वेळी उपस्थित जनसुमुदाय पुढे संजय पाटील, राजेंद्र पाटील, भारत पाटील यांनी शासनाने मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या मागण्या व आरक्षणाची त्वरित दखल न घेतल्यास यापुढेही तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आले.

यावेळी सत्तार इनामदार, महेश पवार, पवन बिनवडे, गौरी कोकरे 
आदीची भाषणे झाली. मागणीचे निवेदन निवासी नायब तहसिलदार संतोष अदमूलवाड, पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, तलाठी मोरे यांच्याकडे देण्यात आले. सरपंच मनोज पुजारी, राजन पाटील, विजयसिंह पाटील, आन्नासो पाटील, प्रमोद पुजारी, रवी पाटील, भारत पाटील, काकासाहेब पाटील, अतुल पाटील, सिद्धेश्वर कोकरे यांच्यासह आंदोलनात माचणुर, बठाण, बेगमपुर, रहाटेवाडी, मुंडेवाढी या परिसरातील सर्वपक्षीय मराठा, धनगर, मुस्लिम युवक, शेतकरी वर्ग सहभागी झाले होते. या परिसरातील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले होते. तसेच या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या आंदोलनात कुठलाही अनुचित प्रकार न घडता व्यवस्थित पार पाडले.

Web Title: MarathaKrantiMorcha protest in bhrampuri in solapur