अक्कलकोट बंदला १०० टक्के प्रतिसाद

राजशेखर चौधरी
सोमवार, 30 जुलै 2018

अक्कलकोट : अक्कलकोट शहरात मराठा समाजाने बोलाविलेल्या अक्कलकोट बंदला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. कारण अक्कलकोट शहर सह तालुक्यातील चुंगी, वागदरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला तालुक्यातील वीस विविध समाज संघटना व पक्ष यांनी पाठिंबा दिला आहे. 

आज सकाळी ८.३० वाजता चुंगी येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर टायर जाळून सरकार विरोधी घोषणा देत मराठा आरक्षणाची मागणी करत निषेध करण्यात आला. वागदरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी वागदरीत कर्नाटक कडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलकानी सरकार विरोधात घोषणा करत बंद करण्याचा आवहान करत होते. वागदरीतील व्यापारी लोकानी सुध्दा आपली दुकाने स्वत: बंद करून बंदला पाठींबा दर्शवला आहे.दुधनी व मैंदर्गी येथे बंदचा परिणाम फक्त बस सेवा व इतर वाहतुकीवर दिसून येत नाही. शाळा कॉलेज नेहमी प्रमाणे चालू होते. दोन्ही शहरातील व्यापार आणि सर्व व्यवहार सुरळीत चालले आहेत.

Web Title: #MarathaKrantiMorcha response to maharashtra band in aakalkoth