#MarathaKrantiMorcha  मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प

राजशेखर चौधरी
रविवार, 22 जुलै 2018

अक्कलकोट : अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प झाले होते. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले

अक्कलकोट : अक्कलकोट येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित चक्काजाम आंदोलनाने वाहतूक ठप्प झाले होते. सकल मराठासमाजाच्यावतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले. दरम्यान या आंदोलनातील अमोल भोसले, नगरसेवक महेश इंगळे, फत्तेसिंह शिक्षणसंस्था अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर,  सुरेश सुर्यवंशी, अरूण जाधव , सरपंच संघटना अध्यक्ष दिलीप काजळे,  योगेश पवार, प्रविण घाटगे, मनोज इंगवले, सुरेश कदम, मनोज गंगणे, दयानंद काजळे यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर रोड विद्युतमंडळ कार्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. परिणामी वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या दोन लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या.यावेळी झालेल्या आंदोलन प्रसंगी सुरेश कदम, दिलीप काजळे, अरूण जाधव, सुरेश सुर्यवंशी,  युवा सेना अध्यक्ष योगेश पवार, बाबासाहेब निंबाळकर, महेश इंगळे प्रा. प्रकाश सुरवसे. राम जाधव  आदींनी आपल्या मागण्यासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या.

मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार गायकवाड यांना देण्यात आले. चक्काजाम आंदोलना वेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. या वेळी रवि कदम, संजय गोंडाळ, चेतन शिंदे, गणपती प्रतिष्ठान अध्यक्ष योगेश पवार, आकाश गडकरी, नितीन मोरे, भरत राजेगांवकर, अमोल पवार,आकाश सुर्यवंशी, आतिष पवार निखिल पाटील, ऋषिकेश लोणारी, लक्ष्मीकांत काळे, विजय माने, विकास पवार, प्रसाद मोरे, अमर पोतदार, बंटी पाटील,  गुणवंत साळुंखे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

आंदोलन शांततामय मार्गाने असल्याने कोणत्याही प्रकारचा अप्रिय प्रकार अथवा तोडफोड, जाळपोळ करू नये असे आवाहन समाजाच्या मुख्यस्थांकडून करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलिस निरिक्षक अमित शितोळे, उपनिरिक्षक नरवटे, सिद्राम धायगोडे, धनराज शिंदे यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवला होता.

Web Title: #MarathaKrantiMorcha Traffic jam by Maratha movement's Chakkajam agitation