पंढरपूर: मराठा आरक्षणासाठी जलसमाधीचा प्रयत्न 

अभय जोशी
शनिवार, 28 जुलै 2018

सचिन शिंगण याने 25 जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते. तेंव्हा पासून अनेकांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता.

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तालुक्‍यातील सुस्ते येथील तरुण सचिन शिंगण याने आज (शनिवार) सकाळी चंद्रभागा नदीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. तथापी कार्यकर्त्यांनी त्याला नदीतून तातडीने बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

सचिन शिंगण याने 25 जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते. तेंव्हा पासून अनेकांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता.

आज सकाळी त्याने चंद्रभागा नदीत उडी मारुन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला नदीतून बाहेर काढून येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

Web Title: MarathaKrantiMorcha youth attempt suicide in Pandharpur