कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

कणेरीवाडीतील युवकाच्या आत्महत्येचे वृत्त कळताच दसरा चौकात दुपारी दोन वाजता शोककळा पसरली. घोषणांनी दुमदुमणारा चौक सुन्न झाला. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ सीपीआरकडे धाव घेतली. त्याचवेळी चौकात मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव जाहीर करुन रास्ता रोकोची हाक दिली. हातात भगवे झेंडे घेतलेल्या तरुणांनी लगोलग रस्ता अडवला.

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करण्याचे सत्र सुरुच असून, आज (रविवार) विनायक परशूराम गुदगे (रा. कणेरीवाडी) या युवकाने आत्महत्या केली. 

#MarathaKrantiMorcha

कणेरीवाडीतील युवकाच्या आत्महत्येचे वृत्त कळताच दसरा चौकात दुपारी दोन वाजता शोककळा पसरली. घोषणांनी दुमदुमणारा चौक सुन्न झाला. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ सीपीआरकडे धाव घेतली. त्याचवेळी चौकात मराठा बांधवांनी आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव जाहीर करुन रास्ता रोकोची हाक दिली. हातात भगवे झेंडे घेतलेल्या तरुणांनी लगोलग रस्ता अडवला.

आज सकाळपासून विविध शहर आणि ग्रामीण भागातील कोल्हापुरातील दसरा चौकात सकल मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जत्थेच्या जत्थे चौकात येत होते. सारा परिसर छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी दणाणून निघाला होता. सकल मराठाचे प्रमुख कार्यकर्ते सीपीआरच्या दिशेने धावले आणि काही सेकंदातच दसरा चौक परिसर येथे स्मशान शांतता पसरली.

Web Title: #MarathaKrantiMorcha youth suicide in Kolhapur