चित्रपंढरीच्या स्मृतींचे होणार जतन

ओंकार धर्माधिकारी
गुरुवार, 14 जून 2018

कोल्हापूर - मराठी चित्रपट निर्मिती शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. हे औचित्य साधून भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास प्रदर्शनरूपाने कायमस्वरूपी मांडला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांना, अभ्यासकांना मराठी चित्रपटसृष्टीची वस्तुनिष्ठ माहिती, चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाचे टप्पे, कलाकार, कुशल तंत्रज्ञ यांची माहिती सहज उपलब्ध होईल.  

कोल्हापूर - मराठी चित्रपट निर्मिती शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. हे औचित्य साधून भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास प्रदर्शनरूपाने कायमस्वरूपी मांडला जाणार आहे. त्यामुळे चित्रपट रसिकांना, अभ्यासकांना मराठी चित्रपटसृष्टीची वस्तुनिष्ठ माहिती, चित्रपट निर्मितीमधील महत्त्वाचे टप्पे, कलाकार, कुशल तंत्रज्ञ यांची माहिती सहज उपलब्ध होईल.  

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी १ डिसेंबर १९१९ रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना करून चित्रपट निर्मितीला प्रारंभ केला. त्यानंतर वेगवेगळ्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या संस्था येथे स्थापन झाल्या. बाबूराव पेंटरांनी स्वतः बनवलेल्या कॅमेऱ्याने ‘सैरंध्री’ चित्रपटाची निर्मिती केली. तेथून सुरू झालेला मराठी चित्रपट निर्मितीचा प्रवास आज जागतिक पटलावर पोहोचला आहे. 

९० च्या दशकापर्यंत कोल्हापुरात चित्रपट निर्मिती सुरू होती. त्यामुळे निर्मितीसाठी आवश्‍यक असणारे भव्य स्टुडिओ, तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, लेखक, कवी, संगीतकार, कलाकार, कारागीर हे सर्व इथे होते. चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हाताने फलक रंगवणारे जी. कांबळे यांच्यासारखे चित्रकारही येथे होते. ‘सावकारी पाश’, ‘शेजारी’, ‘साधी माणसं’, ‘बाल शिवाजी’ यांसारख्या उत्तम कलाकृतींची निर्मितीही येथेच झाली. भालजी पेंढारकर, अनंत माने, व्ही. शांताराम, राजा परांजपे, नानासाहेब सरपोतदार यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक येथे होऊन गेले. आज मराठी चित्रपट जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला असला तरी त्याची बीजे कोल्हापूरच्या तांबड्या मातीमधील आहेत. याची माहिती भावी पिढ्यांना या प्रदर्शनाने होणार आहे. 

चित्रपटनिर्मितीचा समृद्ध वारसा कोल्हापूरला लाभला आहे. हा ऐतिहासिक ठेवा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळेच अशा प्रकारचे अभिनव प्रदर्शनाची कायमस्वरूपी मांडणी करणार आहोत. मराठी चित्रपट निर्मितीचा इतिहास सांगणारे हे पहिलेच कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. 
- श्रीकांत डिग्रजकर, सचिव, भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र

काय असेल संग्रहालयात?
 दिग्गज कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींविषयी माहिती देणारे 
आकर्षक फलक
 जुन्या व दुर्मीळ
चित्रपटांचे बुकलेट
 सुमारे पंधराशे कलाकार, तंत्रज्ञांची माहिती 
 जुन्या काळातील कॅमेरे, ध्वनिमुद्रक व अन्य साधने
 पूर्वीच्या काळी असणारी चित्रपट निर्मितीची प्रक्रिया विशद करणारे फलक
 जुन्या चित्रपटांची हाताने रंगवलेली पोस्टर्स. 

Web Title: marathi film industry history exhibition