एसटी प्रवाशांना देणार गुलाबपुष्प, साखर पेढे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

सोलापूर - राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार या वर्षी मराठी भाषा गौरव दिन सोमवारी (ता. 27) सकाळी 11 वाजता एसटी स्थानकावर अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते पाच प्रवाशांना प्रातिनिधिक स्वरूपात मराठी पुस्तके भेट दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील नऊ आगारातून 18 बसस्थानकावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. 

Web Title: Marathi Language Day to be celebrated unique way MSRTC