अधिकारी लागले कामाला, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

हुकूम मुलाणी
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्ह्यात येणाऱ्या पंचायत राज समितीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त तालुक्यात शासकीय कार्यालयात रंगरंगोटी व दप्तर व्यवस्थीत लावण्याचे काम सुरू असताना तपासणीच्या नावाखाली काही शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची कामे मात्र थांबली आहेत. सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी न भेटल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले.                       

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्ह्यात येणाऱ्या पंचायत राज समितीच्या पाहणी दौऱ्यानिमित्त तालुक्यात शासकीय कार्यालयात रंगरंगोटी व दप्तर व्यवस्थीत लावण्याचे काम सुरू असताना तपासणीच्या नावाखाली काही शासकीय कार्यालयात सर्वसामान्य जनतेची कामे मात्र थांबली आहेत. सोमवारी ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना अधिकारी न भेटल्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले.                       

28 आमदारांचा समावेश असलेली पंचायत राज समिती जिल्ह्यात येत्या आठवडा भरात येणार असून तालुका स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही विभागाची तपासणी करणार असल्याने सर्वच विभागातील अधिकारी कामाला लागले असून. तालुक्यातील विविध कार्यालये, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायत, व यासह अन्य विभाग सतर्क झाले आहेत. पण पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या काही विभागात अजून या समितीबद्दल गांभीर्य नाही. त्यात असलेले स्वच्छता गृह बंद असून सदरची इमारत नुकतीच नव्याने बांधली असून या कार्यालयात ग्रामीण भागातून आलेल्या महिलांची स्वच्छतागृहा अभावी गैरसोय होत आहे. या कार्यालयाला समिती येण्याबाबत गांभीर्य नाही. या समितीकडून ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणीही माहिती घेतली जाणार आहे. 

या समितीत जिल्ह्यातील आ.दिलीप सोपल, आ. भारत भालके, आ. दत्ता सावंत, आ. तानाजी सावंत यांच्या समावेश असून त्यांच्याकडून जिल्ह्याच्या अधिक अपेक्षा आहेत. तब्बल आठ वर्षानंतर ही समिती जिल्ह्यात येत असल्याने प्रत्येकजण सतर्क झाला. आपल्या विभागाचा देखणा अहवाल तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु असल्याचे चित्र आहे. समितीच्या तपासणी साठी स्वच्छता, वेगवेगळ्या माहितीच्या फाईल, व इतर आवश्यक माहिती संकलित करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यात पंचायत समिती आघाडीवर आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे व अन्य विभागात कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील जनतेला मात्र पी. आर. सी. येणार ते गेल्यावर बघू असे शब्द ऐकावयास मिळतात त्यामुळे पी.आर.सी म्हणजे काय हे विचारण्याची व त्याबाबत माहिती घेण्याची वेळ जनतेवर आली. 

 

Web Title: Marathi new solapur news due to cleaning no work in government offices